आज श्री दत्त जयंती आहे. त्यानिमित्ताने ही भावांजलि सादर करीत आहे. श्री दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
हृदयी दत्त मूर्ती नीट बसवावी,
मुखात दत्त दत्त अशी नामें घ्यावी,
श्वास घेता, दिगंबरा पूर्ण मंत्र म्हणा,
श्वास सोडता फक्त दिगंबरा म्हणा,
श्वास आंत असता, दिगंबरा मंत्र म्हणे,
त्याचे संपले, जन्ममरणाचे हे कोडे,
दररोज करी जो, उपासना तास एक,
त्याचे भाग्य वाढे, सुख लाभ अनेक,
दत्त देवता आहे, अगदी तशी साधी,
शुचिर्भूत होऊन, करावा पूजाविधी,
ब्रम्हा, विष्णू आणि शिव जेथे एकत्र,
अशक्य ते होईल, भक्त कृपापात्र,
भक्तिभाव ठेवून, करावी आरती,
समाधान मिळते, नाम घेता चित्ती,
दीक अंबर अशी आहे त्याची सत्ता,
स्मरावे, नमावे, स्वामी गुरुदेव दत्ता…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
