मोबाईल युगात सारे
बांधिलकीत बांधलेले
न कोणा आपसुक वेळ
नाते चिमुकल्या जोडलेले
पुस्तकालय ग्रंथालय
झाले इतिहास जमा
ग्रंथालयाचे भांडारही
कोणा नसे मनी तमा
भाजी जळते, बाळ रडते
क्षुधा भागवी बाहेरून
क्षुधा, तृष्णा सख्या झाला
बाळ पाहते कळवळून
पती पत्नी वाद वृद्धी
घटस्फोटाच्या भानगडी
प्रेम जिव्हाळा संपलेला
कुरघोडी काढती तातडी
दुरध्वनी, न्युज पेपर वा
संपले पुस्तकी वाचन
मोबाईल नावाचे जडले
भूत प्राणाहून प्रिय दर्पण
आई बाबा भेटीचा मोह
व्हिडिओ काॅल करून
सारे माया पाश संपले
मन जाते गुदमरून

— रचना : शोभा प्रकाश कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
