Homeसाहित्यनंदनवन

नंदनवन

भारत मातेच्या
नंदन वनात या
मुक्त सौन्दर्याचा
नजारा पाहू या…

जलाशयावरी
देखणा नजारा
नीलप्रभा परि
शोभती अंबरा…

संथगती शिकारा
पर्यटक पाहती
अनोखा नजारा
मोदे मौज मानती…

फुलले धरेवरी
गुलाब ताटवा
नीर गे किनारी
रंगभरा बरवा….

नियंते रचले
घनगर्द हिरवे
डोंगर पाचूचे
दिसती बरवे….

सभोवती दिसे
प्रतिबिंब गडे
आसमंती भासे
जलाशयी पडे….

मीना घोडविंदे

— रचना : सौ. मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६