आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने ही शब्दांजली. स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
बंधू आणि भगिनींनो
एकाच वाक्यात केले
जगाला आपलेसे
नाव भारतमातेचे उंचाविले !!
विचारांची प्रगल्भता
शब्दात प्रसवली
स्वामीजींनी हिंदू धर्माची
ख्याती वाढविली !!
तरुणांना दिली दिशा
दिला विचारांचा वारसा
केला युवा वर्ग जागा
चालविला हिंदू संस्कृतीचा वसा !!
विवेक, वैराग्य, विद्वत्ता
शालीनता, लीनता, बुद्धीमत्ता
अवघ्या सत् गुणांचा ठेवा
त्रिवार वंदन तुम्हास आमुचे
स्वामी विवेकानंदा
स्वामी विवेकानंदा !!!

— रचना : आशा ज्ञानेश्वर दळवी. सातारा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800
