“कधी कधी”
मंडळी,
असं म्हणतात, की मंगेश पाडगांवकर यांनी “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं…” ही कविता लिहिली, तेव्हा ते साठ वर्षांचे होते.
म्हणजेच, कधी कधी एखादं प्रेम — किंवा एखादं सौंदर्य — इतकं व्यापक आणि उत्कट असतं, की त्यावर कविता लिहिताना कसलच बंधन, किंवा अट उरत नाही.
Vancouver येथे राहणाऱ्या गायत्री येळेगावकर यांनी काढलेलं “Jewel in the Crown” हे चित्र पाहताना, असंच काहीसं वाटतं…
असं सौंदर्य — जिचं अस्तित्व आपल्या जवळ असतं, पण तिच्या रंगाच्या आणि अंतरंगाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शब्द अपुरे पडतात. ते सौंदर्य इतकं नाजूक असतं, की त्याला स्पर्शही करता येत नाही आणि इतकं प्रखर, की विसरणंही अशक्य होतं.
त्या सौंदर्याचा डोलारा सांभाळताना मनात अनेक मनोरे निर्माण होतात. अशाच एका स्वप्नाच्या मनोऱ्यातून साकारलेली ही कविता — “कधीकधी.”
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
