उद्या संक्रातीचा तर आज भोगी सण आहे. दोन्हीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
सण भोगीचा संक्रांती
करी भारतात साजरी
दक्षिणेस पोंगल म्हणती
उत्तरेस म्हणती लोहरी….
गोंडस वांगे निळसर
गाजर अबोली रंगाचे
हरभरा गे हिरवाशार
हुरडा अन पेर उसाचे…
न्यारी चव खिचडीची
धारोष्ण वरती तुपाची
सोबत भाजी भोगीची
तीळभाकरी बाजरीची….

— रचना : सौ मीना घोडविंदे. ठाणे

2) भोगी
भोगी सण आहे मोठा
ऊसासंगे बोर वटाणा
भाज्या सर्व एकत्र करु
सण हा आमचा मराठीबाणा ॥१॥
बाजरी तिळाची कडक भाकरी
भज्जीची करुया की भाजी
राळ्यांचा भात आहे खास
मन आनंदी आहे भोगीसाठी राजी ॥२॥
वांग्याची भाजी व भरीत
खमंग शेंगदाण्याची चटणी
हरभरा वटाणा कांदापात
करुया भाज्यांची छान वाटणी ॥३॥
उपभोग घेऊ आज भोगीचा
भाज्या, पालेभाज्या खाऊ मस्त
सुगड्यांची पुजा होती आज
सण हा मकर संक्रांती मस्त ॥४॥
तीळाची माया स्नेह पुरतो
गुळाची गोडी वाढते सणाला
इंद्रदेव देतो दान कृृषीसंस्कृतीचे
पीक उदंड येते शेतात या सणाला ॥५॥
हिरव्या पालेभाज्या, गाजर, पेरु
हरभरा, वांगे, कांदा पात, लसुण
पालक, चिली, मेथी, शेपु हिरवीगार
चवदार चवळी, वटाणा खाऊ म्हण ॥६॥
आली आली बघा भोगी
मकर राशित सुर्य प्रवेश करती
संक्रांत म्हणजे संक्रमण आनंदाचे
आनंद तीळ वाटुन गोड करती ॥७॥
कृषी संस्कृती छान आपली
संस्कृती ही शिकवते संस्कार
तीळगुळ घ्या हो गोड बोला
मग जीवना येतो हो आकार ॥८॥
सण हा मोठा नाही हर्षाला तोटा
हिवाळा होतो उबदार भोगीने
मन होते सर्वांचे प्रसन्न भाजीने
चव येते तोंडाला बाजरी भाकरीने ॥९॥
आरोग्य उत्तम राहते या सणाला
हिरव्या पालेभाज्या उत्तम आरोग्याला
भोगी हा सण मनात राहतो सर्वांच्या
तीळगुळ पण ऊब देतो आरोग्याला.

— रचना : पंकज काटकर. काटी, जि.धाराशिव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800
