मुख कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आरएसटी कर्करोग रुग्णालय आणि आयएमए नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच नागपूर येथे “मुख कर्करोगावरील प्रत्यक्ष शस्त्रक्रिया कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत
विविध वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील १०२ पेक्षा जास्त पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते.
अतिशय शिस्तबद्धरित्या पार पडलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना जेष्ठ डॉक्टरांकडून अनमोल मार्गदर्शन मिळाले. तसेच सर्व शस्त्रक्रिया समक्ष पाहता आल्या. यामुळे या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या समर्पण आणि शैक्षणिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब पाहता आले. या सहभागींनी सखोल चर्चांमध्ये आणि बहुशाखीय अंतर्दृष्टींमध्ये सहभाग घेतला.
या कार्यशाळेस डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रो-चान्सेलर व मुख्य सल्लागार, दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर; श्री सुनिल केदार, कर्करोग सहाय्य संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, कार्यकारी संचालक, कोमहाड, युके, डॉ. विवेक हरकरे, प्रोफेसर व प्रमुख, नाक,कान व घसा तज्ज्ञ, एनन के पी साळवे आयुर्विज्ञान संस्थान; आणि डॉ. आर. एस. शेनॉई, उपप्राचार्य, व्हिएसपीएम दंत महाविद्यालय आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन पर भाषणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी मुख कर्करोग संकटाचे, विशेषतः ओरल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि ओरल सबम्युकस फायब्रोसिसचे सखोल आणि विचार प्रवर्तक विश्लेषण सादर केले. कर्करोगाचे निदान उशिरा (दुरावस्था ३ किंवा ४) झाल्यास निर्माण होणार्या समस्या त्यांनी अधोरेखित केल्या.तसेच मुळात शस्त्रक्रिया करण्याचीच वेळ येऊ नये यासाठी लवकर निदान आणि प्रतिबंधावर भर देण्याची गरज स्पष्ट केली.

डॉ. हरीश केला, डॉ. अर्शद अली आणि डॉ. उत्कलीका बिसवाल यांनी चार मुख कर्करोग शस्त्रक्रिया प्रत्यक्षात केल्या. या शस्त्रक्रियांमध्ये डॉ. शेफाली चौहान आणि डॉ. स्नेहल नाईक या बधीरीकरण तज्ज्ञांनी भूलदेण्याचे काम केले.
प्रमुख उपस्थितीत डॉ. अनिरुद्ध देवके, उपाध्यक्ष, आयएमए नागपूर; डॉ. जितेंद्र साहू, सचिव, आयएमए नागपूर; डॉ. नासरे; डॉ. मुकदा; डॉ. मयूर; आणि डॉ. प्रशांत सोमकुवर यांचा समावेश होता.

चर्चासत्रात डॉ. हरीश केला, डॉ. कर्तार सिंग, डॉ. प्रशांत ढोके, डॉ. अर्शद अली, डॉ. उत्कलीका बिसवाल आणि डॉ. सुधांशू कोठे, डॉ. बी. के. शर्मा यांचा सहभाग होता.

डॉ. बी. के. शर्मा आणि डॉ. हरीश केला यांच्या अथक प्रयत्नांमुळे कार्यशाळा यशस्वी झाली.
डॉ. सुधीर मंगरुळकर यांनी दुहेरी संवादासाठी लाईव्ह ट्रान्समिशनसाठी व्हिडिओ आणि ऑडिओ व्यवस्था सांभाळली. डॉ. रश्मी राऊत यांनी आभार मानले.
— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800
