Homeबातम्या"जिचं तिचं आकाश : दिलखुलास प्रतिक्रिया"

“जिचं तिचं आकाश : दिलखुलास प्रतिक्रिया”

“जिचं तिचं आकाश” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहोळ्याचे वृत्त आपण या आधी वाचले असेलच. तसेच सोहोळ्यास दिलेल्या शुभेच्छा. प्रत्यक्ष सोहोळ्यात वाचून दाखविण्यात आल्या होत्या आणि त्या पुन्हा कालच्या वाचक लिहितात….या  सदरात प्रसिद्धही करण्यात आल्या आहेत.

या सोहोळ्याच्या वृत्तांत दूरदर्शन च्या “आपली मुंबई” कार्यक्रमात आज; बुधवार 25 मार्च रोजी रात्री 9 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच हा कार्यक्रम उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा दाखविण्यात येणार आहे, या बद्दल दूरदर्शनचे मनःपूर्वक आभार.

आता वाचू या, सोहोळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या रसिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया…

1
चित्रा मेहेंदळे लिखित, ग्रंथाली निर्मित आणि न्यूज स्टोरी टुडे तर्फे प्रकाशित  “जिचं तिचं आकाश” पुस्तकाचे प्रकाशन विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात झाले. हे पुस्तक म्हणजे अमेरिका आणि भारतातील संघर्षातून झेपावलेल्या ३३ स्त्रियांच्या प्रेरणादायी कथांचे संकलन आहे. जीवनात विविध आव्हानांवर मात करून यश मिळवणाऱ्या कर्तबगार महिलांचे अनुभव यात मांडले आहेत. पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे  यात केवळ यश नाही, तर त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठीचा खडतर संघर्ष टिपला आहे.

३३ हा अंक अध्यात्म, अंकशास्त्र आणि हिंदू धर्मात अत्यंत शक्तिशाली मानला जातो, ज्याला ‘मास्टर नंबर’  म्हणतात. हा अंक निःस्वार्थ सेवा, उच्च आध्यात्मिक ज्ञान, करुणा आणि मानवतावादी दृष्टिकोन दर्शवतो. हिंदू धर्मात ३३ प्रकारच्या देवता (३३ कोटी)  यासाठी हा अंक ओळखला जातो.

३३ नंबरचे विविध क्षेत्रांतील महत्त्व पुढीलप्रमाणे आहे……

अंकशास्त्र :
३३ ला ‘मास्टर टीचर’ किंवा ‘मास्टर हीलर’ म्हटले जाते. हे ३ आणि ३ (पवित्र त्रिमूर्ती) च्या संयोगामुळे शक्तिशाली मानले जाते. या अंकाचा स्वामी ‘६’ आहे, जो प्रेमाचे आणि काळजी घेण्याचे प्रतीक आहे.

अध्यात्मिक अर्थ :
हा अंक आत्मिक जाणीव, मानवी कल्याणासाठी त्याग आणि उच्च ऊर्जा दर्शवतो ज्यांचा भाग्यांक ३३ असतो, ते अत्यंत ज्ञानी आणि अंतर्ज्ञानी असतात.

हिंदू धर्म :
वेद आणि पुराणानुसार ३३ प्रकारच्या देवता (८ वसू + ११ रुद्र + १२ आदित्य + २ अश्विनीकुमार) मानले जातात, ज्यांना बऱ्याचदा चुकीने ३३ कोटी (करोड) म्हटले जाते.

विज्ञान :
मानवी मणक्यामध्ये (spinal column) सामान्यतः ३३ कशेरुका (vertebrae) असतात.

३३ नंबरचे आध्यात्मिक संकेत :
जेव्हा तुम्हाला ३३ क्रमांक वारंवार दिसतो, तेव्हा ते देवदूत  तुम्हाला प्रेम, करुणा आणि इतरांची मदत करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे मानले जाते. अधिक महिन्यांमध्ये ही 30+ 3 =३३ वाणांचे महत्त्व आहे.

ह्या सर्व महिलांची कर्तबगारी, कष्ट, जिद्द वाचून  साथ संगतच्या सख्यांना *आपले आपले आकाश* गवसल्या वाचून राहणार नाही. पुस्तक प्रकाशनाचा सोहळा  दिमाखदार झाला.

चित्राताईंना पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.
— डॉ. सुरेखा विवेक जोशी.

2
चित्राताई मेहेंदळे यांच्या जिचं तिचं आकाश या नितांत सुंदर पुस्तकाच्या प्रकाशानाचा सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा आणि चित्राताई विषयी वाटणाऱ्या अभिमानाचा क्षण ! त्याचं खूप सुंदर, ओघवतं आणि अगदी समर्पक वृत्तांत लेखन आपण केलेले आहे 

जिचं तिचं आकाश
आव्हानांवर मात करून अनेक प्रांतात यशाची भरारी घेणाऱ्या 33 स्त्रियांची ओळख चित्राताईंनी त्यांच्या या पुस्तकात करून दिली आहे.साधी सोपी रचना, ओघवती भाषा, तपशीलाचा नेमकेपणा, रंजक, उत्सुकता वाढवणारं तितकंच माहिती पूर्ण लेखन हे चित्राताईंच्या लेखनाचे विशेष आहेत. या सर्वामुळे पुस्तक वाचनीय झालं आहेच. तसंच या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आलेख आणि विविधता वाचणार्‍या प्रत्येकाला स्फूर्ती देणारी आहे.

पुस्तक घरी घेऊन आल्यावर बरचसं वाचून झालं. कारण ते हातातून खाली ठेववतंच नव्हतं.

आव्हानांवर मात करत स्वतःची प्रगती साधत असताना या स्त्रियांनी सामाजिक भान सतत कायम ठेवलं आहे. नि:स्वार्थपणे समाजासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत.

आपलं नवं हिंदू वर्ष हे अधिक मास असलेलं वर्ष आहे. अधिकस्य अधिकम् फलम् | या नियमाने चित्राताईंची नवी पुस्तके नव्या वर्षात येऊ देत आणि त्यांच्या यशाची कमान अशीच सदैव चढती वाढती राहू दे ही सप्रेम शुभेच्छा. — वेदवती कुलकर्णी.

डॉ. सुरेखा विवेक जोशी मॅडम आणि वेदवती कुलकर्णी मॅडम यांच्या मुलाखतीत दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

तसेच आज आणि आज शक्य ना झाल्यास उदया, दूरदर्शन वृत्तांत पाहून आपल्या प्रतिक्रिया, नव्या  कल्पना अवश्य कळवा.

— टीम : एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. मा देवेंद्र आणि अलका भुजबळ यांना,
    सप्रेम नमस्कार
    आपल्या न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलवर चित्रा मेहंदळे यांच्या जिचं तिचं आकाश हे सदर आपण प्रकाशित करत होता.
    आयुष्याशी लढा घेऊन यशाचे शिखर गाठणाऱ्या, अनेक प्रांतात यश मिळवणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या 33 स्त्रियाची ओळख करून देणारे हे लेख पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले.
    त्या सुंदर प्रकाशन सोहळ्याला मी उपस्थित होते.

    चित्राताईंच्या मधले लेखन गुण ओळखून त्यांच्या लेखनाला आपण उभयतांनी वेळोवेळी प्रसिद्धी दिली. ही सर्व लेखमालिका तयार करण्यात आणि आता ती पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आपला सिंहाचा वाटा आहे.
    *गुणि गुणम् वेत्ति |*
    हे वचन तुम्हा दोघांना ही लागू आहे.

    आपल्या या कार्याबद्दल आपणा दोघांचे, चित्राताईंचे आणि ग्रंथालीचे मनःपूर्वक अभिनंदन.

    आपले पोर्टल अनेक दर्जेदार लेखन प्रसिद्ध करत असते. ते वाचताना फार आनंद होतो. खूप नवी माहिती मिळते. नव्या कर्तबगार व्यक्तींचे परिचय होतात. मनःपूर्वक आभार आणि आपल्या पोर्टलला खूप साऱ्या सप्रेम शुभेच्छा.🌷🙏
    शुभैषी,
    वेदवती कुलकर्णी.

    • *१७.३.२०२६*

      ३३अंकाचे महत्व पाहताना मणक्यातील ३३ कशेरुका यावरून कणा या कवितेची प्रकर्षाने आठवण आली.
      *कणा*’ ही प्रसिद्ध मराठी कविता जेष्ठ कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांची आहे
      ही कविता कठीण परिस्थितीतही स्वाभिमान न गमावणाऱ्या माणसाची जिद्द आणि लढाऊ वृत्ती दर्शवते.
      हाच बाणा आजच्या पुस्तकातील 33 महिलांमध्ये दिसला.

      *डॉक्टर सुरेखा विवेक जोशी*
      [3/18, 08:46] Surekha: *१७.३.२०२६*

      *जि* द्द
      *चं* गळवादाला दूर
      सारून
      *ति* न्ही त्रिकाळ
      कुटुंबाची काळजी
      घेऊन आपले ध्येय
      गाठणाऱ्या
      *चं* दनासारखे झिजून
      सुगंध
      पसरविणाऱ्या
      *आ* शावाद
      बाळगणाऱ्या
      *का* र्याला प्राधान्य
      देणाऱ्या
      *श* तकानुशते
      चाकोरीबद्ध
      जीवनाला छेद
      देणाऱ्या
      *३३ महिलांचे* प्रगतीपथावरील मार्गक्रमण म्हणजे *चित्राताई मेहंदळे* यांचे
      *जिचं तिचं आकाश*

      *डॉ.सुरेखा विवेक जोशी*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments