Homeसाहित्य“संवादभूषण”: दाद 3

“संवादभूषण”: दाद 3

आज मी कृतकृत्य झालो !

माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात, जे केवळ आनंद देत नाहीत तर आपल्या संपूर्ण जीवन प्रवासाची आठवण मनात उजळवून टाकतात. असाच एक भावनिक आणि अभिमानाचा क्षण माझ्या आयुष्यात आला.

प्रसार माध्यमांतील प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनकथांचा संग्रह असलेल्या लेखक देवेंद्र भुजबळ लिखित, ग्रंथाली निर्मित, न्यूज स्टोरी टुडे प्रकाशित; “संवादभूषण” हे पुस्तक आज माझ्या हातात पडताच, त्या क्षणाचे औचित्य साधत मी ही प्रत माझ्या आईच्या हस्ते उघडली. जिच्या आशीर्वादाने, संस्कारांनी आणि मायेच्या सावलीत माझ्या जीवनाचा प्रवास घडत गेला, त्या आईच्या हातून या पुस्तकाची पहिली पाने उघडली गेली—हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरला.

या पुस्तकात अनुक्रमांक 26, पान क्रमांक १२७ वर माझी जीवनकथा प्रकाशित झालेली पाहून मनात अपार समाधानाची भावना दाटून आली. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्तींच्या समवेत माझ्या जीवनप्रवासाची नोंद झाली, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

या प्रेरणादायी प्रवासात अनिल शाह, संध्याताई अमृते, प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे, कवी अशोक नायगावकर, कवी प्रा अशोक बागवे, जेष्ठ पत्रकार कुमार कदम, नारायण जाधव, महेंद्र कोंडे, खंडूराज गायकवाड, डॉ. बबन जोगदंड, मधुकर घोडविंदे, कांचन कंदले, मरियम मिर्झा अशा अनेक मान्यवर व्यक्तिमत्त्वांसोबत माझा — विजय होकर्णे उल्लेख झालेला पाहून मन कृतज्ञतेने भरून आले.

खरं तर माणसाचा प्रवास हा त्याच्या प्रयत्नांचा, संघर्षांचा समाजाकडून मिळालेल्या प्रेरणेचा संगम असतो. त्या प्रवासातील काही पावले समाजाच्या स्मरणात राहावीत, यासाठी शब्दांच्या माध्यमातून ती नोंदवली जाणे म्हणजे त्या कार्याला मिळालेला सन्मानच होय.

माझ्या कार्याची दखल घेऊन मला या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या रांगेत स्थान दिल्याबद्दल लेखक तथा निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ तसेच सौ. अलका भुजबळ यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या लेखणीतून अनेक व्यक्तिमत्त्वांचे जीवन समाजासमोर आले आणि त्या प्रवासात माझ्या आयुष्याचाही एक छोटासा अध्याय सामील झाला, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.

आज या क्षणी मी एवढेच म्हणू इच्छितो की, हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या कुटुंबाचा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील मला मार्गदर्शन प्रेरणा देणाऱ्या अधिकारी, सहकारी, संपादक, पत्रकार, छायाचित्रकार, मित्रपरिवाराचा आणि मला प्रेम समर्थ साथ देणाऱ्या समाजाचा आहे. या प्रेरणेच्या बळावर पुढील काळातही समाजासाठी काही सकारात्मक कार्य करण्याची उमेद अधिक दृढ होत राहील. धन्यवाद !

विजय होकर्णे

— लेखन : विजय होकर्णे. छायाचित्रकार, नांदेड.
— संपादन’: देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments