Homeसाहित्यसावरकर…

सावरकर…

(मधुसिंधू काव्यलेखन)
(5–6–6–5)

सावरकर ते
संसार देशाचा
करण्या कष्टाचा
जन्मुनी येथे… 1

लेखणी त्यांची
विचार जहाल
पेटवी मशाल
हो अन्यायाची… 2

करावासात
हात ते जाहले
घाण्यास जोडले
तरीही शांत… 3

त्याग करुनी
वाढवूनी शान
जाहले महान
वीर होऊनी… 4

देश भक्ताचे
गाऊ जयगान
करुनी नमन
देश भक्तास… 5

सावरकर
कारागृही भिंती
वाणी व लेखणी
जीवन सार्थ… 6

मीना घोडविंदे

— रचना : सौ. मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments