Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात….या सदरात आपले स्वागत आहे. खरे म्हणजे, आपले हे सदर मंगळवारी प्रसिद्ध होत असते. पण वाढत्या कार्य बाहुल्यामुळे हे सदर प्रसिद्ध करायला आजचा दिवस उजाडला, या बद्दल क्षमस्व.

सध्या राज्यात, राष्ट्रात आणि एकंदरीतच जगात जे काही चालू आहे, त्यामुळे विचारी माणसाला प्रश्न पडला आहे की, या जगाचे होणार तरी काय ? याची चिंता सतावते आहे आणि मग या सर्वांचे प्रतिबिंब आपल्या पोर्टलवरही पडल्यास नवल ते काय ?

अशा या परिस्थितीतही काही व्यक्ती, काही संस्था उमेद वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, ही निश्चितच दिलासा देणारी बाब आहे. अशा व्यक्ती, संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले पोर्टल यथाशक्ती योगदान देत आहे. आपल्याही पाहण्यात अशा व्यक्ती, संस्था असल्यास कृपया त्यांची सचित्र माहिती अवश्य कळवा. उज्ज्वल उद्यासाठी आपल्या कडून होतील तितके प्रयत्न करू या.
आता वाचू या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

माजी कुलगुरू डॉ विजय पांढरीपांडे यांनी लिहिलेल्या, “मुला मुलींनो, नाउमेद होऊ नका” या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया ….
1
This is a deeply sensitive piece. It is beautifully written. I actually felt even more disturbed after reading it. Indeed, so many innocent students are suffereing for no fault of their own. What a pity !
— Dr Rajan Harshe. ExVc BHU Varanasi.
2
सद्य परिस्थिती नक्कीच बदलेल पुन्हा एकवार वातावरण प्रफुल्लित होईल
आशा करायला काय हरकत आहे ?
— कवयित्री सुरेखा पाटील. मुंबई.

सावरकर विशेषांक…
प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया..
1
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक समवेत अमूल्य योगदान…सुंदर लेख.
— प्रकाश राजोपाध्ये.
2
स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांना आदरांजली अर्पण करणारा हा विशेषांक अतिशय उत्तम आहे. तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांना विनम्र अभिवादन 🙏🌹
— स्वाती वर्तक. मुंबई.
3
सावरकर विशेष अंक फार आवडला. लेखक श्री देवेन्द्रजी यांच्या पुस्तकाचे परीक्षण पुस्तक पूर्ण वाचण्यासाठी प्रेरक ठरते. घ्यायला पाहिजे.

वसुंधराजींचा सोळावा भाग ही खूप वाचनीय झाला आहे.

मीनाजींची कविता चांगली आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई.

थोर गायिका सुमन कल्याणपूर यांच्यावर अमेरिका स्थित शिल्पा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया….
1
नमस्कार सर,
आपल्या आजच्या पोर्टलमधील शिल्पाताई यांचा ‘सुमनस्वरांजली’ हा लेख वाचला.
शिल्पाताईंनी अतिशय तरल आणि मधाळ आवाज असणाऱ्या, आदरणीय सुमन कल्याणपूर यांची खूऽऽऽऽऽऽऽप छान ओळख करून दिली आहे.
त्यासाठी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. फक्त ‘अस्तित्वरहित सूर’ जरा खटकले.
त्यांची गाणी म्हणजे गानरसिकांना आनंदाची दुर्मीळ मेजवानीच !
अतिशय सोज्वळ चेहरा तेवढाच सुसंस्कृत स्वभाव. वादविवाद, प्रसिद्धीवलयापासून लांब राहणाऱ्या सुमनताई म्हणूनच हव्याहव्याशा !
बहुतेक जणांना माहिती असेलच की, बेळगांवच्या प.पू.कलावती आई या सुमनताईंच्या ज्येष्ठ नणंद होत्या.
अशा या अजरामर व्यक्तीमत्वास माझी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏
— श्रद्धा जोशी. डोंबिवली.
2
सुमनस्वरांजली अप्रतिम सुंदर लेख. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि सुमनताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपुर.
3
Beautifully written, have shared on few of our family groups.
— रेखा नाडकर्णी. मुंबई
4
वाह शिल्पा .. अतिशय समर्पक आणि समृद्ध शब्दांमध्ये आदरांजली अर्पण केली आहेस सुमनताई कल्याणपूर यांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या स्वरांना ..फार छान लेख .. नक्की शेअर करतेय .
— सुप्रिया जोशी सरवटे. अमेरिका
5
खरंच गोड सूर हरपला.
— चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक. मुंबई.
6
लेख खुपच सुंदर लिहिला आहे आणि लेखाच्या सांगतेला लिहिलेले वाक्य “देवगंधर्वा़समोर सुरू असणारी अस्तित्व रहित सुरांची अविस्मरणीय मैफिल” या वाक्यासाठी तर खुप कौतुक तुमचे,कारण आतातरी कोण वरचढ कोणाच्या सुरात साम्य हे भेद गळून पडले असतील.🙏
— वैशाली कमलाकर.

श्री माधवदादा गोगावले, अमेरिका यांनी लिहिलेल्या “अभिनव टेमगिरवाडी शाळा” या अत्यंत प्रेरणादायी वृत्तांतावर प्राप्त झालेले अभिप्राय ..
1
मनःपुर्वक धन्यवाद, सर . तुमच्या एका भेटीमुळे शाळेची माहिती अनेक देशात पोहोचली. तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आणि हे सर्व एका मराठी माणसामुळे घडून आलं याचा खूप अभिमान वाटतो.
— दीपक रे – टेमगिरवाडी
2
माधवराव तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुम्ही मायभूमीत जाऊन केवढं काम करता खरंच वाखाणण्यासारखा आहे. अमेरिकेसारख्या देशात वास्तव्य करून परत आपल्या देशात जाऊन एवढी कामगिरी करणे सगळ्यांनाच जमत नाही. Madhavji. Hats off to you. You are a real sevak
— नीलिमा अ. – शिकागो
3
अभिनंदन माधवदादा! तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
— वंदना प. – शिकागो
4
टेमगिरवाडी शाळा खूप छान उपक्रम आहे. असेही सर्वांगीण मदत करणारे लोक आहेत हे वाचून खूप बरं वाटलं. छोटेसे तीनशे वस्ती असलेले गावातील शाळेबद्दल वाचून खूप छान वाटलं आणि तुम्ही सविस्तर लिहिलंय. तुमचं लेखन नेहमीच सुरेख अभ्यासपूर्वक आणि स्फूर्तीदायक असतं. तुमचे सगळे लेख नेहमी परत वाचावेत असे खूप वाटतं.
थँक यु.
— विद्या क. – शिकागो
5
Khoop chhan Madhavdada! Congratulations Madhavdada.. Fruitful trip back home. It resembles Gurukul..
एका छोट्याशा गावातील आदर्श शाळेची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची ही प्रेरणादायी यशकथा आपल्या प्रभावी शब्दांत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल माधवदादांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या या सामाजिक आणि साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, अशीच उत्तमोत्तम आणि प्रेरणादायी माहिती आमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत राहा.
— लक्ष्मी दे. – शिकागो
6
खूप छान लिहीलंय माधवदादा.
— रेखा दे- शिकागो.
7
मंडळी, समाज प्रबोधन, साहित्य, इतिहास, अध्यात्म, Fitness आणि अशा अनेक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आपणा सर्वांचे लाडके अष्टपैलू माधवदादा गोगावले (@⁨Madhav Gogawale⁩) यांच्या प्रेरणादायी उपस्थिती आणि लेखणीतून साकारलेला हा अनुभव/लेख अवश्य वाचा, अभिनंदन माधव दादा !
— अनिरुद्ध दा. – शिकागो.
8
अभिनंदन. छान लेख आहे.
— विजय बा. – कोरेगाव बुद्रुक
9
खरोखरच माहितीपूर्ण लेख. आजकाल मराठी माध्यमाच्या सरकारी शाळेवर लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक आहे. आपल्या गावातील शाळेच्या विकासासाठी मी पूर्णपणे सहमत आहे आणि त्यासाठी मी नेहमीच वेळ आणि प्रयत्न करण्यास तयार असेन. आपल्या गावातील शाळा ही अशीच व्हावी हाच विचार अगदी माझ्या मनातही खूप पूर्वीपासून आहे.
— विश्वास दे. – कोरेगाव बुद्रुक
10
Very nice. खूपच छान सर खूप खूप धन्यवाद !
— रामकृष्ण वा. टेमगिरवाडी
11
Are wah masta! Khupach Chan
— काश्मीरा म. – शिकागो .
12
खूप छान लिहिला आहे लेख
— अक्षदा सा. – शिकागो
13
Awesome!
— Pranoti G. – Pune
14
खूप छान लेख माधवदादा –
— अर्चना. शिकागो
15
लहान शाळेतील कर्मचाऱ्यांचे व ग्रामस्थांचे अभिनंदन
— अजय दे. – अमरावती
16
सुंदर मस्त लेख.
— गणपत क. – चाकण
17
दादा, लहान गावातील शाळेची माहिती खूप छानपणे तुम्ही लिहिली आहे.
— आनंदा पा. – राजगुरुनगर
18
शाळेबद्दल फोटोसहित सुरेख लेख लिहिला आहे. अभिनंदन!
— माधव ज. – मुंबई
19
Madhavrao Namaskar…Jai Jijau… Very good experience and right up… Madhavrao these schools need proper or sufficient funding support from persons like us who have enough to live and now let’s spread the resources around us… You may use your good will and help them to keep the spirit up
— निर्मलकुमार दे. छ. संभाजीनगर
20
अभिनंदन माधव दादा. लेख खूप आवडला. लहान शाळेची कामगिरी प्रशंसनिय आहे.
— मीनाक्षी – पुणे
21
great work done at these remote places that we do not know! The article is wonderfully written !
— श्रीदत्त रा. – – शिकागो
22
शाळेविषयी लिहिलेली माहिती खूप आवडली.
— संगीता, खेड.
23
Shalevishavi phar Chan article ahe. Group var share Kele — मंजुषा पा. – शिकागो
24
लेख वाचला. खूप छान शाळा आहे.
— श्रद्धा भ. – शिकागो .
25
Congratulations Madhav dada.
— उल्का न.- शिकागो
26
आपण लिहिलेला संपूर्ण लेख वाचला.टेमगिरी येथील शाळा आणि त्या संदर्भातील आपला लेख दोन्हीही प्रेरणादायी आहे .खूप छान माधवदादा. आपले मनापासून अभिनंदन! इतकी वर्षे अमेरिकेत आहात परंतु आपली भारताशी जोडलेली घट्ट नाळ ह्यातून वारंवार जाणवते. माधवदादा, आपण इतके छान कार्य करता.
— अर्चना भा. – नाशिक
27
वा मस्तच!

  • जगन्नाथ ढि. – – नाशिक
    28
    Congratulations Madhav dada! Nicely written about Shaala.
    — Vrushali – A – Chicago
    29
    Hearty congratulations To Madhavdadaji. As usual you never forget anyone and to see them respectfully.
    — राजीव गो. – शिकागो
    30
    Congratulations Madhavdada! You have always been a very social and cordial person that everyone feels an easy connection with as soon as they meet you!
    — Anand D. – Chicago
    31
    Congratulations @⁨Madhav Gogawale⁩ dada
    — Vishal N. – Chicago

1
“पुस्तकप्रेमी” स्नेह सम्मेलन वृत्तांत खूप छान.
— शोभा सुभेदार. ठाणे
2
एव्हढ्या वृक्षांचे रोपण ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
मनःपुर्वक अभिनंदन.
💐💐💐💐💐
— अ‍ॅड. भानुदास शोचे. नाशिक
3
दोन हजार वृक्षांचे लागवड 👌🌱
— सुधीर थोरवे. पर्यावरणवादी, नवी मुंबई.
4
अधिकमास निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम फारच छान वाटला.
— शोभा कोठावदे. नवी मुंबई
5
अरे विवाह विवाह….. कवयित्री शोभा कोठावदे यांनी त्यांच्या कवितेतून सध्याचा महत्वाचा प्रश्न मांडला असून सर्व वस्तुस्थिती वर्णन केली आहे !!! एक सामाजिक समस्या कवयित्रीने चिंतनाकरता मांडली आहे.या समस्येला एकच उत्तर आहे, संस्कार की जे मूलतः दोन्ही कुटुंबात असावे लागतात… 🙏💐.
— प्रा मनोहर यादव. सातारा

“झेप” सदरात श्री तुकाराम मुंढे, आय ए एस यांच्यावर श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया …..
1
मुंढे सरांविषयी अतिशय चांगला लेख लिहिला आहे. खरंच अशा व्यक्ती आपल्या देशात असतील तर आपला देश मागे राहू शकणार नाही.
— शुभांगी गान. ठाणे
2
खरच, तुकाराम मुंडे यांची कामगिरी खूपच डॅशिंग आहे. आदर्श व्यक्ती आहेत. 👌🏻🙏
— स्नेहा मुसरिफ. पुणे
3
तुकाराम मुंढे …यांच्याबद्दल वाचून कौतुक वाटले, अभिमान वाटला .खरेच आता त्यांची पुनः पुनः बदली करून त्यांचा अपमान करू नये ..त्यांची धडाडी टिकून राहावी हीच सदिच्छा
— स्वाती वर्तक. मुंबई
4
सन्मा श्री तुकाराम मुंढे साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने अनंत अनंत शुभेच्छा !! तसेच त्यांच्या उर्वरित काळातील धडाकेबाज, बेडर कारवाई करण्यासाठी अधिक मनोबळ मिळत राहो हीच आमची मनोकामना आणि हार्दिक शुभेच्छा !!
— राजाराम जाधव. नवी मुंबई
5
असे तुकाराम मुंढे गावोगावी जन्माला यावेत तेव्हाच चोरांपासून संरक्षण होईल, आरोग्याचे रक्षण होईल, रोगाचे प्रमाण घटेल, आनंदाने सर्व प्रकारांचे सेवन करायला मिळेल, आंबा, केळी हल्ली विषारी केमिकल युक्त पदार्थ विकले जात आहेत, त्यांना आळा घालणे खूप गरजेचे आहे.
— शोभा कोठावदे. नवी मुंबई
6
श्री तुकाराम मुंढे ह्यांचे हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. जीवेत् शरदः शतम्! खूप छान लेख लिहिला आहेत. तुमचेही मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपुर.
7
तुकाराम मुंडे हे भारतीय प्रशासनातील समाजाभिमुख कार्य करणारे लोकमित्र अधिकारी.त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा उत्तम लेख.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन
8
नमस्कार सर,
आपला, श्री. तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख वाचला. एका अत्यंत निर्भीड,कर्तृत्ववान, प्रामाणिक आणि जेथे जातील तेथे आपले कर्तव्य चोख व निस्पृहपणे करणाऱ्या अधिका-याचा जीवनपटच डोळ्यांसमोर उलगडला. संपूर्ण भारतात असे अधिकारी असतील तर आपला देश विश्वगुरु म्हणून सूर्य-चंद्र असेपर्यंत राहील यात शंकाच नाही. पण…..हा पणच फार घात करतो आहे. श्री. तुकाराम मुंढे साहेबांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुरारोग्यासहित आभाळभर शुभेच्छा.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली

लेखिका जयश्री शंकरन यांनी वाद संवाद छान लिहिले. मस्त…
— अरुण इंगळे, पुणे.

— टीम एन एस टी. ☎️+91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments