Homeपर्यटनशिवतीर्थ भिवगड प्रदक्षिणा यशस्वी

शिवतीर्थ भिवगड प्रदक्षिणा यशस्वी

शिवराज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बदलापूर येथील श्री शिवछत्रपती अँडव्हेंचर ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली दुसरी राज्यस्तरीय शिवतीर्थ भिवगड प्रदक्षिणा मोहीम बीजारोपण करीत तळपत्या उन्हात यशस्वीपणे पार पडली.

मुंबई महानगर पालिका सुवर्णपदक पुरस्कार सन्मानित गिर्यारोहक अनिल शेवंती कृष्णा चाळके (चालुक्य) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिव्यांग प्रेरणा पुरस्कार सन्मानित गिर्यारोहक जनार्दन भागिरथी नारायण पानमंद यांच्या कुशल नेतृत्वाखाली, या मोहिमेला सुंदर भिवगड – हरित भिवगड, मुली वाचवा – देश वाचवा, व्यसने सोडा – माणसे जोडा, जीवसृष्टी वाचवा – पर्यावरण वाचवा, पाणी वाचवा – जीवन वाचवा, अंधश्रद्धा सोडा – विज्ञान निष्ठा वाढवा, अवयवदान – महादान, देहदान – परमदान अभियानाचे स्वरूप देण्यात आले. या मोहिमेमध्ये बालके, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग व्यक्तींनी सुध्दा सहभाग घेतला.

प्रथम भिवगड ची तळछावणी असलेल्या हनुमान मंदिरात उद्घाटन होवून श्री अनिल चाळके यांनी प्रदक्षिणा मोहिमेचे स्वरूप समजावून सांगितले. सह्याद्री परिमंडळातील शिवतीर्थ भिवगड च्या हनुमान मंदिर, ढाकभैरी खिंड, गौराई देवी मंदिर, यमाई देवी मंदिर, कातकरी वाडी, पाण्याची टाकी, पुनश्च हनुमान मंदिर असे झाडाझुडपांच्या, काट्याकुट्यांच्या जंगलातून जाणारी सुमारे ४ किलोमीटर अंतराची अतिशय अवघड व खडतर प्रदक्षिणा मोहीम दोन तासात पार पडली.

प्रदक्षिणा मार्गाच्या च्या टप्प्या टप्यात जनार्दन पानमंद हे माहिती देत होते. मार्गात मानवी साखळी करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविण्यात आले.

या मोहिमेचा सांगता समारंभ भिवगड ची तळछावणी असलेल्या हनुमान मंदिरात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक दिवंगत सोमनाथ समेळ सर संकल्पित कणखर मनाचे व निर्धारक्षम हृदयाचे नेतृत्व घडविणाऱ्या या मोहिमेला शुभेच्छा देणारे कुळगाव-बदलापूर नगरपरिषद चे वैद्यकीय अधिकाऱी डाॅ राजेश अंकुश, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांचे प्रशंसनीय शुभसंदेश वाचण्यात आले.

८ ते १५ वयोगटातील आराध्या मेटे, महेश्वरी सैदम, रिधिमा सैदम, दुर्वा उतेकर, बाळू यादव, ईशान पाडावे सह ७५ वर्षाचे ज्येष्ठ दिव्यांग देवजी रोकडे, ५९ वर्षाचे दिव्यांग जनार्दन पानमंद, ६२ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय सावंत हे उत्कृष्ट पुरस्काराचे मानकरी ठरले. तर प्रदीप चव्हाण,नितीन बने, प्रवीण उतेकर, प्रमोद पाडावे, सुरेश पाटील, मयुरा सैदम, अंकिता मेटे हे विशेष पुरस्काराचे मानकरी ठरले.

या मोहिमेच्या यशस्वितेसाठी भूपेंद्र प्रताप सिंह चौहान, गोपाळ सावळे, शितल घोलप, पल्लवी उतेकर, दिव्यांग अनामिका म्हात्रे यांनी अपार परिश्रम घेतले.

या मोहिमे साठी मुंबई, ठाणे,रायगड जिल्ह्यातून गिर्यारोहक आले होते.

या समारंभानंतर कडाव येथील प्राचीन महागणपतीचे दर्शन घेऊन पोखरकरवाडी येथे जनार्दन पानमंद यांच्या निवासस्थानी सर्वांनी दुपारी सहभोजनाचा आनंद घेतला.
भोजनोत्तर छोटासा पण शानदार कार्यक्रम आयोजित केला महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या जनार्दन पानमंद यांचा अनिल चाळके व सहकाऱ्यांनी टोपी, शाल, श्रीफळ, सह्यादी चे वारे पुस्तक आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदाय चे असलेले प्रतीक म्हणून श्री विठ्ठल रखुमाई ची सुबक मुर्ती भेट देण्यात आली. त्यांच्या सुविद्य पत्नीला साडी,श्रीफळ आणि वटसावित्री निमित्त सात फुटी वटवृक्षाचे रोपटे भेट देण्यात आले. सत्काराला उत्तर देताना पानमंद परिवाराने सर्वांचे आभार मानले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments