Homeबातम्यापांचगणी : कचऱ्यापासून संसाधनाकडे

पांचगणी : कचऱ्यापासून संसाधनाकडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणीत हिलदारी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात पर्यावरण संवर्धन, शाश्वत कचरा व्यवस्थापन, स्वच्छता जनजागृती आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून ‘कचऱ्यापासून संसाधनाकडे’ (Waste to Resource) आणि ‘स्वच्छ व शाश्वत पर्यटनस्थळ’ या संकल्पनांना प्रभावीपणे चालना देण्यात आली.

पर्यावरण संरक्षण आणि परिपत्र अर्थव्यवस्थेचा संदेश देण्यासाठी टेबल लँड परिसरात कमी मूल्याच्या प्लास्टिक कचऱ्यापासून (Low-Value Plastic Waste) तयार करण्यात आलेल्या अपसायकल्ड सार्वजनिक फर्निचरचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे प्लास्टिक कचऱ्याची पुनर्प्रक्रिया करून त्याचे उपयुक्त सार्वजनिक सुविधांमध्ये रूपांतर कसे करता येते, याचे प्रभावी उदाहरण नागरिकांसमोर ठेवण्यात आले.

पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंचगणीमध्ये पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांची निर्मिती करून जबाबदार पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला.

पर्यावरण दिनानिमित्त शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यटकांसाठी आकर्षक ठेवण्यासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “सर्वोत्कृष्ट स्वच्छता कर्मचारी पुरस्कार” प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली. स्वच्छता व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात येणार आहे.

या उपक्रमामागील उद्देश स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे, त्यांच्या कार्याला समाजात योग्य मान्यता मिळवून देणे आणि शहर स्वच्छतेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा गौरव करणे हा आहे.

या उपक्रमांसाठी आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, सिटी कोऑर्डिनेटर श्री. ओंकार ढोले, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, मुकादम तसेच हिलदारी प्रकल्पाच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.

पांचगणी नगरपरिषदेमार्फत हिलदारी प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, जबाबदार पर्यटन आणि नागरिक सहभाग वाढविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे पंचगणी शहर अधिक स्वच्छ, हरित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत बनण्यास चालना मिळत असून, स्वच्छ व जबाबदार पर्यटनस्थळ म्हणून पंचगणीची ओळख अधिक दृढ होत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी विविध पदाधिकारी, अधिकारी, मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments