Homeसाहित्यतुम्ही स्वच्छ राहून बघा…

तुम्ही स्वच्छ राहून बघा…

तुम्ही स्वच्छ राहून बघा,
मी लोकांचे नमुने दिसतील, केले
किती भोळा, वेडा आहे,
लोक फसवून हसतील,

ही रोज बदलते नीती,
किती लोक बदलती रंग,
तुम्ही अनुभव घ्या हो याचे,
सारे आपल्यातच दंग,

तुम्ही स्नेह वाढवा थोडा,
हे संशय हो घेणार,
तुम्ही जीव लावला यांना,
हे त्यातही खुळ बघणार,

निर्भेळ प्रेम जरी केले,
हे स्वीकार ना करतील,
हे असेच कर्मदरिद्री,
कधी फुलतील ना उमलतील,

यांना नाहीच ते दिसते,
कशी हिरवी होई धरती,
यांना ना घेणे कसले,
किती नवरोपे तरतरती,

तुम्ही मुक्त मनाने जगून घ्या,
सोडा यांचा विचार,
तुम्ही खरे प्रेम ते वाटा,
यांना उशिरा कळणारव

मग आठवण येईल तुमची,
मग करतील तुमची पूजा
पण ते क्षण जगणे होते,
हे विसरून जातील राजा…

हेमंत भिडे

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments