आला श्रावण श्रावण
पावसाला विसरुन
पळणाऱ्या ढगांत
बसला रुसून
नाही रंगला बाई
ऊन पावसाचा खेळ
सणावारांची चंगळ
तुपाच्या धारेला मंगळ
झाडा वेलींचा बहर
लेकराविना उदास
कच्च्या बच्चा कळ्यांना
पावसाची गं आस
ओल्या झिम्माड पावसात
झोका झेप घेई आकाशी
ऊन पावसाच्या खेळात
रंगतात माहेर वाशिनी
ये रे ये रे पावसा
तुला देईन खरा पैसा
आसुसली धरणी माय
वाट पाहते होऊन चातक…!!!
— रचना : काव्य प्रभा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
