Homeसेवादिन विशेष

दिन विशेष

“साक्षरता दिन”

केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबी नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.

राष्ट्रकुलच्या ‘युनेस्को’ या संघटनेने १९६५ साली जागतिक पातळीवर साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा केली व त्याच्या पुढच्या वर्षापासून ८ सप्टेंबरला जगभर तो साजरा करण्यात येत असून अजूनही या दिनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असतो.

युनेस्कोच्या व्याख्येनुसार “साक्षरता म्हणजे माणसाला दैनिक जीवनाशी निगडित बाबीविषयी लिहिता वाचता येणे, मानवी जीवनातील घडामोडींचे विश्लेषण करता येणे व वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वत:च्या व समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे” ही होय.

भारतात ही साक्षरता अभियानाचे चांगले फलित दिसून आले आहे. एका आकडेवारीनुसार १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा साक्षरता दर हा १२ % इतकाच होता. मात्र बदलत्या काळाबरोबर आपला साक्षरता दर ७४ ते ८० % पर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय साक्षरतेच्या तुलनेत ही वाढ पुरेशी नाही.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा.

संजीव वेलणकर

— संकलन : संजीव वेलणकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मीनाक्षी on संगती रंग : २८
वैजू दातार on माझी जीवन नौका : नऊ
Nadgauda Gururaj Narayana retired Assistant commissioner Fisheries on माझी जीवन नौका : १५