श्याम नंदलाला रे श्याम नंदलाला….हा व्हिडिओ खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही जेव्हा हे गाणं ऐकाल ना, तेव्हा त्याचा प्रत्येक शब्द मनाला नक्कीच भिडेल. जे कृष्णभक्त आहेत, त्यांना तर हे गाणं अजूनच जास्त आवडेल आणि त्याचा अर्थही खूप सुंदर वाटेल. 🦚💙
सुरेखाताई गावंडे आपल्या योगा क्लासचा एक भाग आहेत. त्या खूप सुंदर कविता लिहितात, स्वतःची गाणी तयार करतात आणि त्या लेखिका देखील आहेत. त्यांनी मला योग दिनानिमित्त एक खूप सुंदर पुस्तक भेट दिलं होतं.

त्या पुस्तकामध्ये त्यांनी योगावरसुद्धा एक सुंदर कविता लिहिली आहे. त्यांनी मला त्यांची अनेक पुस्तकंही दिली आहेत. त्या खूप छान लेखन करतात आणि चित्रपटसुद्धा बनवतात. ❤️
त्यांनी कृष्ण आणि राधेचे फोटो सर्वांकडून मागवले होते. त्यानुसार त्यांनी या सुंदर गाण्यामध्ये फोटो खूप छान पद्धतीने ॲड केले आहेत. गाण्यात ज्या शब्दांप्रमाणे प्रसंग येतात, त्याला अगदी सुंदर आणि योग्य असे फोटो त्यांनी निवडले आहेत. त्यामध्ये माझ्या मुलाचा आणि मुलीचाही फोटो त्यांनी ॲड केला आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा व्हिडिओ आणखी खास आहे. 🥰

त्यांनी हे गाणं स्वतः लिहिलं आहे आणि ते खरंच खूप सुंदर झालं आहे. तुम्ही सगळ्यांनी एकदा नक्की हा व्हिडिओ बघा.
आवडला तर नक्की Like करा ❤️ आणि त्यांच्या Surekha Gavande या YouTube Channel ला जरूर Subscribe करून त्यांना प्रोत्साहन द्या.
— लेखन : शितल साळुंखे. योगा टीचर, कल्याण.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
