Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. या बद्दल आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गणपती ही विद्येची देवता आहे. आपला देखील विद्येचा प्रसार व्हावा, हाच हेतू आहे. हा हेतू साध्य होण्यासाठी कटिबद्ध राहू या.
आता वाचू या, वाचकांच्या प्रतिक्रिया.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

1
आपली मुलाखत. बघितली अभिनंदन.
सियाटेल चे संमेलन वाचून आनंद झाला..त्यात आमच्या अनेक नातेवाईकांनी भाग घेतला होता.. बक्षिसं ही मिळवली.
संगती रंग मध्ये अग्नेस ची व्यथा वसुंधरा ताईंनी नीट मांडली आहे
श्रावण सर वाचनीय
कोण श्रेष्ठ कविता वाचताना मज्जा वाटली.
— स्वाती वर्तक. मुंबई.
2
अमेरिकेतील मराठी माणसांच्या संमेलनाचा अप्रतिम वृत्तांत.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन
3
काल मी तुमची मुलाखत पाहिली. ती अत्यंत माहितीपूर्ण आणि डोळ्यांत अंजन घालणारी ठरली. तुमच्या शब्दांमधील मोत्यांसारखे अनमोल विचार आणि संभाषणातील भावुकता मनाला भिडली. देवेंद्र सर आपले मनःपूर्वक अभिनंदन !
— विजयकुमार कट्टी. ठाणे
4
श्री वानखेडेजीनी अगदी बरोबर महत्वपूर्ण शब्द उचलत संपादकजींच्या मुलाखतीचा गोषवारा घेतला आहे ..हे खरेच आहे की आपण नुसते खुर्चीवर जाऊन न बसता तेथे बसून किती समाजसेवा करू शकतो हे बघणे गरजेचे…श्री भुजबळांची ही मुलाखत खूप वास्तवदर्शी आणि विचारप्रवण होती..आवडली होती मलाही.

पार्लेकरांचा डंका…खूपच छान दुमदुमला आहे चित्राताई…छान वाटले…प्रत्येकाला आपल्या नगराचे कसे अप्रूप असते ते शब्दोशब्दी जाणवले आणि खरेच ते पार्लेकरांनी सिद्ध केले ..
पॅट्रिक ग्रँट बद्दल वाचून नवे ज्ञान मिळाले..धन्यवाद..
सृष्टी ताईंनी लिहिलेले वाक्य खूप भावले…माझं ते खरं करीत बसण्यापेक्षा .. खरं ते माझं…म्हणावे…उत्तम..
लेख आवडला.
— स्वाती वर्तक. मुंबई
5
नमस्कार सर..
आपली मुलाखत खुपच अभ्यासपुर्ण ..शब्दांचा आणि समृद्ध विचारांचा खजिनाच मिळाल्याचे समाधान झाले.. मी माझ्या अनेक सहकारी मित्रांंना सांगितले.. हे आमचे साहेब आहेत व मला साहेबांबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले.. खुप म्हणजे सगळ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या ..
खुप धन्यवाद, आभार व अभिनंदन..
— रविन्द्र घोगे. सिन्नर
6
मर्मबंधाचे पुढे पडलेले पाऊल वाचून खूप आनंद झाला , इतक्या सीरिअल्स आणि चित्रपटात केलेले तिचे संवाद लेखन लाखो लोकांच्या पसंतीला पडते आहे यातूनच तिचे कर्तृत्व सिद्ध झाले आहे….असेच यश मिळत राहो ही शुभेच्छा…भुजबळ सर नेहमीच एक एक मौक्तिक शोधून आणतात ..धन्यवाद.

बी एम एम चे संमेलन .एक एक कला चित्रा ताई उलगडत आहेत .. उत्तम.. आज नृत्याबद्दल विशेष .

वेदवती यांचे पहिले सेलिंग… झुमूड बरोबर पायलट पर्यंत आपण हिंडून येतो …नवनवीन कथा कळतात ..मजा वाटते..धन्यवाद

कोण होते …कविता खरेच विचार करायला लावणारी आहे ..चारित्र्य नीती चे पाठ पढवणारे, शिष्याचा अंगठा मागणारे ..कोण होते.
— स्वाती वर्तक. मुंबई
7
माझी जीवन नौका भाग 15 वरील प्रतिक्रिया…
Vedvati, खूप छान लिहिलं आहेस 👌👌
किती चित्त थरा रक आणी रिस्की life असतं ग ship वरचं. तु केलेलं वर्णन वाच ताना डोळ्या समोर सगळं चित्र उभं राहिलं. आम्ही पण जणू त्या बोटीतून प्रवास करत आहोत असा भास झाला. बोटीवर सहा सहा महिने काम कराव्या लागणाऱ्या स्टाफच जीवन कसं असतं याची माहिती मिळाली. तुला पण ते थोडं अनुभवता आलं. बोटीतून डॉक्टर कडे जात असताना तुला तीन मजली शिडी वरुन खाली उडी मारावी लागली ते वाचताना अंगावर काटा आला. तुझी भाषा शैली अतिशय ओघवती आहे. तुझ्या मुळं आम्हाला बोटी वरच्या थरारक life ची खुपच माहिती मिळाली.
पुढच्या भागाची मी तरी आतुरतेने वाट पाहात आहे.
— अलका भावसार.
8
आदरणीय श्री. देवेंद्र भुजबळ सरजी नमस्कार.
आपली मर्मबंधा गव्हाणे यांची सुंदर आठवण आणि आपण दिलेला पदवीदान सोहळ्यातील गाऊन जणू तिथेच यशस्वी होण्यासाठी भरभरून आशिर्वाद दिला असेच जाणवते आणि त्यानंतर मर्मबंधा गव्हाणे ह्या यशाच्या वाटचालीस सुरूवात करतात. असेच जाणवते. कधी कधी एखादी गोड आठवण आयुष्यात किती अविस्मरणीय ठरते असेच वाटले.
मर्मबंधा गव्हाणे मॅडमजीना पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎊
— सीता राजपूत. अंबेजोगाई
9
नमस्कार भुजबळ साहेब,
मलाही तुमची संकल्पना खूप आवडली की ज्येष्ठ नागरिक संघ आणि वाचनालयाने वाचक मंडळ सुरू करावेत .
वेळ होईल तस आपण पर्सनल भेटून यावर काम करू सर.
धन्यवाद
— प्रभाकर गुमास्ते. अध्यक्ष ग्रंथालय नेरूळ
10
जेष्ठ नागरिक संघानी वाचकमंडळे सुरू करावीत…..देवेंद्र भुजबळ……..ही कार्यक्रमाची बातमी वाचण्यापेक्षा मी तो विचार वाचला……आणि मनात प्रश्न निर्माण झाला की हे अजून कोणाला का सुचले नाही ??? सुचले असेल तर त्या मंडळांची चळवळ का झाली नाही ?? चळवळ असेल तर ती समाजाला का माहित नाही ??? समाजाला माहीत नसेल पण समाजाला उपयुक्त असेल तर हा विचार करणारे आणि आपल्या भाषणातून व लेखणीतून समाजाला मार्गदर्शन करणारे आदरणीय देवेंद्र भुजबळ सर यांनी हे समाज सुधारण्याचे वैचारिक कार्य किती स्वागतार्ह आहे !!!!! खरेच अशी मंडळ सुरू झाली तर ती खऱ्या अर्थाने परिपक्व विचारा ना कृतीत उत्तरवना री चालती बोलती ग्रंथालये ठरतील !!! कारण वाचन केलेल्या विचारांचे मंथन करणारे अतिशय परिपक्व व्यासपीठ म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ होय….त्यामुळे भुजबळ सर यांचा विचार कृतीत आला तर निश्चितच देशाच्या मानव विकास निर्देशांकात वाढ होऊन सामाजिक स्तर वाढून २०४७ चे भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल !!!!!🙏💐
— प्रा मनोहर यादव. सातारा
11
ज्येष्ठ नागरिक संघांचे वाचन मंडळ एक स्तुत्य उपक्रम ..त्याला बऱ्याच वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळालीच आहे त्या साठी संपादकजींचे आभार आणि अभिनंदन… व खूप खूप शुभेच्छा

बी एम एम संमेलनाचा समारोप वाचून किंचित हळहळ वाटली आता अधिकची माहिती कोण देणार ..असो..गदिमा आणि बाबूजी यांची गाणी अजून अमेरिकेत देखील गायली जातात केवढे प्रशंसनीय..अभिमान वाटला

वसुंधरा ताईंचा ..
ऋणानुबंध अद्भुत…. कुलकर्णीजींची कथा वेगळ्याच नात्याची, भावनांची आनंद झाला.
बडबड गीतं आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई
12
खरंय आपलं म्हणणं.केवळ छंद म्हणून नव्हे तर वाचनाकडे एक therapy म्हणूनही पाहता येते. आपले विचार अमूल्य आहेत.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन.
13
नमस्कार देवेंद्र,
सर्व भाषांचा आदर करून त्या त्या भाषा शिकल्यावर त्या धर्म, जात, पंथ, देश या पुरत्याच मर्यादित राहत नाहीत तर तुम्ही सांगीतल्याप्रमाणे माणसांना खरोखर जोडण्याचे काम करतात.
धन्यवाद
— माधव ना. गोगावले. शिकागो, अमेरिका.
14
भाषा माणसांना जोडण्याचे काम करते हा विचार अतिशय सुत्य आहे भुजबळ सर 👍🏻
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन
15
भाषा ही जोडण्याचे काम करते ..संपादकजींच्या या उक्तीसाठी मी पूर्णपणे सहमत आहे ..नवनवीन भाषा तुम्हाला त्यात्या क्षेत्रातील लोकांना, लेखक, कवींना समजून घेण्यास मदत करते ..साहित्य वाचता आले तर उत्तमच ..साहित्य हा समाज मनाचा आरसा आहे ….माझे वडील भारताचे भाषावार वर्गीकरण करू नका हे पंतप्रधान नेहरूंना अर्ज करणारे स्वातंत्र्य सैनिक होते….जर तुम्ही नवीन भाषा शिकणारच नाही तर सौहार्द्र वाढणार कसे ?

संजीवजींचे साक्षरता दिना निमित्त लिहिलेले विचार योग्यच आहेत
वेदवती यांची जीवन नौका छान डौलात पुढे जात आहे ..वाचून आनंद होतो.
रश्मीजींची कविता वाचनीय …अर्थपूर्ण….प्रत्येक परिस्थिती चा आनंदाने स्वीकार करावा आणि परमेश्वराचे आभार मानावे …. जी परिस्थिती आपल्याला लाभलीय ती आपल्या पेक्षा अधिक वाईट अवस्थेत खितपत पडलेल्या लोकांपेक्षा उत्तमच आहे त्यासाठी आभारी असावे देवाचे ..हेच खरे
— स्वाती वर्तक. मुंबई
16
भाषा हे व्यक्त होण्याचे साधन आहे. मी व्यक्त झाल्यानंतर त्या विचारांचा समोरच्या माणसावर काय परिणाम होतो हे त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असते. त्यामुळे माझे व्यक्त झालेले मत समोरची व्यक्ती तोडण्याचे माध्यम म्हणून सुद्धा उपयोगात आणू शकतो. सध्या हेच चालू आहे.
— सुनील देशपांडे.
17
आपला हा लेख खूपच विचार प्रवण आहे ..आजचा दिवसच…खूप महत्वाचा आहे ज्यांनी आत्महत्या केली जे सोडून गेले त्यांची फक्त आठवण करण्यासाठी नाहीतर जे या दिशेकडे प्रवृत्त होत आहेत त्यांना थांबवण्यासाठीचा हा दिवस.

मला तर खूप खेद होतो विचार करून …की सुशिक्षित , समाजात मानाचे स्थान मिळविणारे , सर्व काही समाजात मिळवणारे…असे असलेले का करीत असतील आत्महत्या…का तो क्षण फक्त .. नैराश्येची सर्वोच्च पातळी गाठलेला असतो ..जर का तो क्षण निघून गेला तर ….बहुदा ती व्यक्ती बाहेर आली असती..
डॉ शीतल आमटे, नितीन देसाई, सुशांत राजपूत का करत असतील हे कृत्य ?

सध्या तर बालकांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढताना दिसतेय ..ही अत्यंत शोचनीय बाब आहे..

तुम्ही लिहिता तसेच…लहान ..एकेरी कुटुंब याचे एक कारण असू शकते ..पालकांची व्यस्तता…मुलांकडे बघायला वेळच नाही
मुलाला आपले शल्य सांगायला कोणी नाही …
सध्या समाज माध्यमं देखील याला कारणीभूत आहेतच ..मुलांकडून पालकांच्या अवाजवी अपेक्षा देखील..
प्रत्येक मूल समान कसे असू शकते…सकारात्मक विचार आणि तर्कसंगत विचार यात फरक आहेच….आपल्या मुलांच्या कुवतीचा तर्क, युक्तिसंगत विचार करणे गरजेचे आहे…मुलांना प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हायला सांगणे..तेथे प्रथम क्रमांकचं मिळवणे ..असले प्रकार बालकाला दडपणाखाली आणतात..”मी जर चांगले करीन तरच माझे महत्व आहे नाही तर” ..हे ताण तणाव सुप्तपणे त्याच्या मेंदूत ठाण मांडू लागतात.
मुलांमध्ये आत्मविश्वासाबरोबरच पालकांविषयी देखील विश्वास असणे गरजेचेव आहे, पालकांनी ..आपली भाषा बदलायला हवी..तुझ्यावर माझा विश्वास नाही कुठे जातोय सांग.
असे म्हणण्यापेक्षा…तुझी काळजी वाटते रे आम्हाला …सांगून जात जा …असे बोलणे कधीही श्रेयस्कर

पण सध्याची पिढी देखील इतकी चाणाक्ष आहे की .पालकांपुढे देखील खूप मोठे आव्हान आहे…आई वडील असे का बोलताहेत हे देखील ते समजू लागले आहेत .

फक्त एवढेच वाटते…मुलामध्ये ही जाणीव निर्माण करण्यात जरी आपण यशस्वी झालोत तरी यशोशिखर गाठण्यासारखे आहे..की ..मुलाला वाटते आपण आपले दुःख,..चुकून केलेले लज्जास्पद कृत्य , आपली हार आईवडिलांना सांगू शकतो….त्यांच्या खांद्यावर विसावू शकतो…तरी खूप

हा विषय चार ओळीत संपवण्यासारखा नाही…खूप लिहावेसे वाटतेच पण आज एवढे पुरे ..
जेन झी ने केलेला वाढदिवस खरोखरच खूप कौतुकास्पद.
संगीत खुर्ची …मधील दाहक वास्तव मनाला अस्वस्थ करते…नाव बदलून घ्या म्हणजे मिळेल बदली असो…किंवा मुलीच्या अपंगत्वासाठी सहानुभूती मिळवून ती गरज नसताना कायम करणे असो..वाईट वाटते…
पंख जिद्दीचे …साठी अभिनंदन. पाऊस कविता छान आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई
18
संगीत खुर्ची वास्तववादी विषयावरील कटुसत्य असलेला लेख..सुंदर!
पाऊस कविताही सुरेख शब्दशैलीने मनाला भावली.दिनविशेष वरील लेख पण छान लिहिला आहे आपण ! 👌🏻
— स्नेहा मुसरिफ. पुणे

माझी जीवन नौका : (भाग १६) काही प्रतिक्रिया…
(१)
वेदवती – पने,
खूप छान आणि सविस्तर लिहिले आहेस. साता समुद्रापार गेल्यावर नुसते आपल्या गावाचे नाव ऐकल्यावर तुझी काय अवस्था झाली असेल समजू शकते. नवीन बंदरे, त्यांची नावे, तू वाचलेली कादंबरी हे सर्व उल्लेख वाचताना मजा येते.
तुझ्याबरोबर आम्ही ही ship मधून प्रवास करतो आहे असे वाटते.त्यामुळे तुझ्या पुढील प्रवासाची उत्सुकता ताजी राहते.
— रजनी गोखले.
(२)
वेदवती,
लेखमालेतील हे सोळावे पुष्पही उत्कंठावर्धक व मनोरंजक आहे. 👌👏 क्षणभर स्वतःच कोळशाची कन्साइनमेंट घेऊन चाललोय असे वाटले !
हल्दिया व तुतीकोरिन बंदरांचा उल्लेख थोडा भूतकाळात घेऊन गेला. ट्रेनिंग चालू असताना या बंदरांना भेट दिली होती.

भारत सरकारला नावं बदलण्याची भारीच हौस! त्या हौशीला अनुसरून हल्दिया बंदर आता “श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट” व तुतीकोरिन बंदर आता “वल्लिनायगम ओलागनाथन चिदंबरनार पोर्ट” अशा भारदस्त नावांनी ओळखली जातात. चिदंबरम हे एक स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांनी बंदर विकसित करण्याचे स्वप्न ब्रिटिश काळात पाहिले.

एक हस्तलिखित नकाशा लेखात आहे. श्रीलंकेला वळसा घालून तुतीकोरिनला जाणारा जलमार्ग दाखविणारा हस्तलिखित नकाशा समाविष्ट करता आला तर बघ. मग दक्षिण भारताचा नकाशा वगळलास तरी चालेल कारण तो नेटवर सहज उपलब्ध असतो.
— प्रमोद गोवंडे. (Retired commissioner of customs)
(३)
वेदवती, प्यूनी दासीच्या कहाणीचे वर्णन फार सुंदर.
जहाजावरील संपूर्ण जीवन सुंदर रीतीने लिहिले आहेस. हल्दिया गावाची सफर अनुभवली. आकाशवाणी सांगली केंद्र माहेरच्या गावाचे नुसतं नाव ऐकले तरी होणारा आनंद तुझ्या शब्दातून फार छान व्यक्त झाला.👌
— आरती जोशी
(४)
वेदवती, अतिशय सुंदर !
सर्व चित्रच डोळ्यासमोर उभे राहते.लिखाण ओघवते आहे. आकाशवाणी सांगलीचा उल्लेख तर चित्तवेधक.
लिहित रहा. वाचत राहू.
— शिरीष उकिडवे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments