श्री राजीव जलोटा यांची नियुक्ती अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय या पदावर करण्यात आली आहे.
माहिती तंत्रज्ञान ( सामान्य प्रशासन विभाग) विभागाचे प्रधान सचिव श्री एस व्ही आर श्रीनिवास यांची नियुक्ती गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव या पदावर करण्यात आली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव श्री सौरभ विजय यांची बदली वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.
श्री जलज शर्मा यांची नियुक्ती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका या पदावर करण्यात आली आहे.