लेखिका प्रतीक्षा तोंडावळकर यांच्या “पंख जिद्दीचे” या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात सादर करण्यात आलेली समयोचित कविता….
— संपादन
तोंडात नव्हता सोन्याचा चमचा
नव्हते सुखाचे सावलीदार छत्र,
परिस्थितीने दिले काटे किती
तरी मनात होते स्वप्नांचे चित्र!
सफाई कामगार म्हणूनी,
झाला सुरू प्रवास
तिच्या संघर्षाचा,
जिद्दीच्या बळावर गाठले
तिने शिखर कर्तृत्वाचे
अडथळ्यांनी वाट अडवली
तरी पाऊल कधी न थांबले,
मेहनतीच्या प्रत्येक थेंबातूनी
यशाचे मोती जन्मले
स्वाभिमानाची ज्योत अंतरी,
डोळ्यांत स्वप्नांची भरारी
कर्तृत्वाच्या पंखांवर उडत
गाठली उंची तिने सारी
सहाय्यक महाव्यवस्थापक पदावर
नाव अभिमानाने कोरले
संघर्षाच्या उन्हातून चालत
यशाचे आभाळ गाठले
*पंख जिद्दीचे* केवळ कथा नव्हे
ही प्रेरणेची अमूल्य शिदोरी,
प्रतिक्षाताईंच्या जीवनातूनी
दिसते जिंकण्याची नवी पहाट सोनेरी
शब्दांना लाभली चारुशिलाताईंची
लेखणी समर्थ, भावस्पर्शी,
एका स्त्रीच्या संघर्षगाथेला
मिळाली अक्षरांची सुंदर वेशी
आज पुस्तकाच्या रूपाने
उलगडली जिद्दीची कहाणी,
कर्तृत्वाला सलाम करीत
उपस्थितांच्या डोळ्यांत दाटले
आनंदाचे पाणी
जिथे जिद्द तिथे दिशा
जिथे प्रयत्न तिथे यश,
स्वप्नांना पंख लाभले की
आकाशही वाटते आपलेच खास
— रचना : प्रा.अर्चना अंबासकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

अतिशय सुंदर, समर्पक आणि प्रसंगोचित कविता! उत्तम मानवंदना! मनःपूर्वक अभिनंदन! 🙏💐