१) अभंग
शक्ती आणि भक्ती | पवित्र मिलन
दसरा पावन | समन्वयी ||१||
भारत संस्कृती | शौर्य उपासक
वीरता पूजक | दसऱ्यात ||२||
प्रभु रामचंद्र | रावणाशी मात
विजयश्री त्यात| रामायणी ||३||
औरंगजेबास | शिवाचे प्रस्थान
धर्माचे रक्षण | ह्याचदिनी ||४||
कुबेराने शमी | सोन्याच्या मोहरा
वैभवी सागरा | भरीयेले ||५||
शमी वृक्ष पानं | एकमेका द्यावे
वैभव मिळावे | सर्वांभूती ||६||
धन धान्य वृद्धी | अश्विन मासात
चैतन्यचि त्यात | वृद्धिंगत ||७||
अहंकार जळो | षड्रिपू दहन
मनाने पावन | पुजनात ||८||
अश्विनीची पूजा | तनया रुपात
आदिशक्ती त्यात | निरखावी ||९||
— रचना : शोभा कोठावदे. नवी मुंबई.
2) दसरा
साजरा करु या सण दसरा
व्यथा, चिंता, ताण विसरा
चेहरा ठेवू या सदा हसरा
आपुलकी अन् प्रेमाचं ठेवू नातं
भेटू या एकमेकांच्या संगतीने
जोडीला आहेत आपट्याची पाने
सध्या उष्णता आहे तीव्र
पाऊस पाण्यासाठी करु प्रार्थना
करु या महालक्ष्मीची आराधना
रांगोळीने सजती अंगण दार
झेंडूच्या फुलांच्या शोभती माळा
साजरा करु नव कार्याचा सोहळा
एकमेका देऊ हात मदतीचा
आनंद चैतन्याचा मांडू पसारा
सर्वांना आपुलकीचा
शुभ दसरा…!!!
— रचना : काव्य प्रभा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
