जे जे कला महाविद्यालयाचे माजी कला विद्यार्थी, सुप्रसिध्द छायाचित्रकार व शिवसेनाप्रमुख मा. उध्दवसाहेब ठाकरे यांचा आज साठावा वााढदिवस.
विद्यार्थी जीवनापासून ते आजपर्यंत अतिशय विनम्र स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख माझ्यासह अनेक शिक्षकांनी अनुभवली आहे. ते विद्यार्थी असतांना मी सहाय्यक अधिव्याखाता म्हणून जे.जे.मध्ये रूजू झालो होतो. तसा मीही तरूणच होतो. पण आजही ते आदरानेच बोलतात. कुठलाही गर्व नाही, अभिनिवेश नाही साधेपणा तर नसानसात भरलेला आहे. 1992 साली शिवसेनेतर्फे निवडणूक भित्तिचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मला मिळाले होते. हिंदुत्वाची संकल्पना पक्षाने स्विकारली होती. त्यावरच मी घोषवाक्य तयार केले होते व भित्तिचित्रात मा.बाळासाहेबांचे छायाचित्र टाकले होते. ते भित्तीचित्र परिक्षकांना भावल्याने मला प्रथम पुरस्काराचा मान मिळाला होता. ते घोषवाक्य असे होते.. हिंदुत्व आमचा प्राण, भगवे आमचे निशाण, निवडून आणा धनुष्यबाण, वाढवा महाराष्ट्राची शान हे स्लोगन त्यावेळी खूप गाजले होते. त्याचा पारितोषिक वितरण सोहळा स्वत: उध्दवसाहेबांनी सेना भवनवर आयेजित केला होता.

त्यांची वेगवेगळ्या कार्यक्रमात भेट होत असे. ते आवर्जून स्वत:हून आदराने चौकशी करीत. हा विनम्रपणा आजही मला भावतो. आमच्या जे.जे. कला महाविद्यालयाचे विद्यार्थी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर सर्वच चित्रकार, कलावंतांना आनंद झाला. म्हणून आमच्या काही कलावंतांनी त्यांची सदिच्छा भेट घेण्याचे ठरवले. ही भेट पत्रकार सचिन उन्हाळेकर यांनी आयोजित केली. मुख्यमंत्री दालनात ही सदिच्छा भेट झाली. त्यावेळी त्यांना माझे दोन कलाग्रंथ “महान भारतीय चित्रकार” व “भारतीय चित्रकार आणि ज्योतीष ग्रहयोग” भेट दिले. त्यावेळी जे.जे.स्कुल आँफ आर्टचे माजी अधिष्ठाता व शिल्पकार प्रा. एम.पी.पवार, चित्रकार कृष्णा पाटील, धातु शिल्पकार बर्नाड चावीस व पत्रकार सचिन उन्हाळेकर होते. आजच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त मा. उध्दवसाहेबांना आईभवानी दिर्घायुष्य प्रदान करो व त्यांच्या हातून जन कल्याणाची भरपूर कार्य होवोत अशी प्रार्थना करतो.
By प्रा.डाँ. सुभाष पवार, निवृत्त प्राध्यापक, जे जे स्कुल ऑफ आर्ट्स, 986955661