Sunday, September 14, 2025
Homeयशकथामिशन आयएएसचे विशाल नरवडे झाले IAS

मिशन आयएएसचे विशाल नरवडे झाले IAS

आज रात्री 9:30 वा IAS विशाल नरवडे डॉ नरेशचंद्र काठोळे यांच्या फेसबुक लाईव्ह (facebook live) वरून आपली यशोगाथा मांडणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१९साली झालेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये सध्या पश्चिम बंगालमध्ये आयपीएस (IPS) अधिकारी असलेले श्री विशाल नरवडे यांचा समावेश आहे. त्यांना ९१ रँक मिळाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका लहान खेड्यातील असलेले श्री नरवडे हे मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी लिहिलेले ” मी कलेक्टर बनणार ” हे पुस्तक वाचून प्रेरीत होऊन स्पर्धा परीक्षेकडे वळले. खरं म्हणजे, अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर त्यांची कॅम्पस मुलाखतीत खाजगी कंपनीसाठी निवड झाली होती. पण त्याचवेळी त्यांच्या वडिलांनी डॉ. काठोळे लिखित ” मी कलेक्टर बनणार ” हे पुस्तक दिले. आणि ते पुस्तक वाचून त्यांच्या करिअरची दिशाच बदलली.

Mission IAS

या पुस्तकातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा वाचून तेही प्रेरीत झाले आणि स्पर्धा परीक्षेकडे वळले. ज्या पुस्तकाने माझ्या करिअरची दिशा बदलवली ती बाब मी कदापी विसरू शकणार नाही असे सांगून आता “मी कलेक्टर बनणार ते झालो कलेक्टर.” हे पुस्तक लिहिणार असल्याचा मनोदय मिशन आयएएसशी बोलताना व्यक्त केला. यावेळी डॉ. काठोळे यांनी दैदिप्यमान यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

लॉक डाऊनच्या काळात श्री नरवडे यांनी डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले होते. श्री विशाल नरवाडे यांनी प्रचंड आत्मविश्वास, चिकाटी व धैर्याने अभ्यासाचे नियोजन करून हे यश संपादन केले आहे. आज कलेक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
आज रात्री 9:30 वा ते डॉ नरेशचंद्र काठोळे यांच्या फेसबुक लाईव्ह (facebook live) वरून आपली यशोगाथा मांडणार आहे.

देवेंद्र भुजबळ.9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आनंद झाला आहे. मनःपूर्वक अभिनंदन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा