रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचा टेनिस क्रिकेट खेळाडु निलेश कांबळीचा ऑस्ट्रिया देशातील प्रथम श्रेणीच्या सामन्यांमध्ये तसेच युरोपियन लिगच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणुन उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल ऑस्ट्रियन क्रिकेट ओसिसिएशन तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला.
ऑस्ट्रियन क्रिकेट संघटनेच्या पंच प्रशिक्षण उपक्रमातील स्टेज १ व स्टेज २ च्या परिक्षा पार करत निलेशने येथील स्थानिक टी २० तसेच ५० षटकांच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. आयसीसीच्या युरोपियन देशांमध्ये क्रिकेटच्या प्रसाराच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या युरोपियन क्रिकेट लीगच्या ऑस्ट्रियातील व्हीएन्ना येथे झालेल्या जर्मनी -ऑस्ट्रिया आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघांदरम्यानच्या सामन्यातही मॅच ऑफीशियल म्हणुन त्याने अचूक कामगिरी पार पाडली. याचाच गौरव ऑस्ट्रियन क्रिकेट संघटनेचे चेअरमन यांचे हस्ते विशेष कामगिरीचे प्रशस्तिपत्रक देऊन निलेशला गौरवण्यात आले.
या गौरवात निलेश कांबळी याने पंच म्हणुन केलेल्या नि:पक्षपाती व अचुक कामगिरीचे कौतुक केले असुन यापुढे आयसीसीच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचांची जबाबदारी देण्यासाठीही शिफारस करण्यात आली आहे.
Click here to read रणजी पटू, क्रिकेट प्रशिक्षक शेखर गवळी गेले चटका लावून…
परिचय
कापसाळ चिपळुण येथे जन्मलेल्या निलेशने चिपळुणच्या दातार महाविद्यालयातुन कला शाखेत पदवी घेऊन सावर्डे येथे व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. आपल्या अष्टपैलु खेळाने त्याने डिबीजे महाविद्यालयाच्या संघाला आंतरमहाविद्यालयीन सीके नायडु स्पर्धा तसेच मुंबई विद्यापीठ झोनल लेव्हलचेही जेतेपद मिळवून दिले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध टेनिस खेळाडू असलेला मोठा बंधु नंदु कांबळी याच्यासोबत निलेशने स्थानिक टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये ऑल राऊंडर म्हणुन आपला वेगळा ठसा उमटवला. मुंबईत एल अँड टी , सिमेन्स इ. आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असताना लेदर बॉलच्या कॉर्पोरेट क्रिकेट लिगमध्ये सहभागी होत त्याने प्रभावी कामगिरी केली होती . निलेश सध्या युनायटेड नेशन्सच्या आयएइए आस्थापनेच्या ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथील हेड क्वार्टर मध्ये माहिती तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहे.
लहानपणापासुन खेळाची आवड जोपासणाऱ्या निलेशने स्थानिक टेनिस क्रिकेटमध्ये चिपळूणच्या इलेव्हन फायटर्स , सुधिर इलेव्हन तसेच रत्नागिरीच्या आवाज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे . आपल्या कर्तृत्वाने एवढ्या उंचीवर असताना आपल्या यशाचे श्रेय तो कोकणी असणाऱ्या मातृभूमीतील टेनिस क्रिकेटच्या सहकाऱ्यांना देतो.
Click here to read शिक्षक दिन विशेष: COL आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका स्वाती वानखेडे
निलेशची यशस्वी घोडदौड पाहता चिपळूणचा हा सुपुत्र भविष्यात सायमन टोफेलच्या बरोबर पंच म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यात दिसेल आणि रत्नागिरीसह महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवेल अशी खात्री त्याच्या सर्व सहकाऱ्यांना वाटते.
चिपळूणसारख्या छोट्या शहरातील युवकाने सातासमुद्रापार मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
– तुषार शिंदे ,चिपळुण
Best wishes for your career.
👍🙏🙏🌷🌷