Thursday, September 19, 2024
HomeलेखCorona warriors : प्रिय कोरोना योध्यानो सलाम तुमच्या धैर्याला !

Corona warriors : प्रिय कोरोना योध्यानो सलाम तुमच्या धैर्याला !

ज्या ज्या व्यक्तिंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाच्या विषाणूंनी त्रस्त केले आहे, भंडावून सोडले आहे, तसेच जी मंडळी निरोगी असूनही केवळ कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेच्या भावनेतून या विषाणूग्रस्त व्यक्तिंची सेवा करताहेत आहे, औषधोपचार करताहेत त्या सर्व कोरोना योध्याना मनापासून सलाम !

निमित्त कोरोनाचे ! Click here

वास्तविक पाहता मी काही अशी फार मोठी व्यक्ती नाही पण सहज मनात आले म्हणून दोन गोष्टी लिहित आहे. काही महिन्यांपासून आपण जागतिक संकटाचा मुकाबला करीत आहोत. नाही.. हो म्हणता अनेक लोकांना या विषाणूने अंकित केले आहेत. शहर असो, खेडे असो, गल्ली असो, चाळ असो, मोठी इमारत असो सर्वत्र या विषाणूंनी नुसता धुमाकूळ घातला आहे. सामान्य जनता असो , नेते असो, सिनेमा क्षेत्र, बँक असो, दवाखाना असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात ह्या विषाणूने कहर माजवला आहे. अगदी लाखो लोकांचा आवडता बिग बी सुद्धा स्वतःला या आजारापासून दूर ठेवू शकला नाही.

Corona warriors India media doctors police are corona front fighters

अशा परिस्थितीत धैर्याने, धाडसाने काम करणारी अनेक क्षेत्र आहेत. पोलीस, डॉक्टर आणि त्यांचे सहकारी, सफाई कामगार आणि बँकींग क्षेत्रातील कर्मचारीही, पत्रकार इत्यादी या लढ्यात तनमनधनाने उतरले आहेत. ही सारी क्षेत्रं समाजाच्या अगदी जवळ जाऊन काम करणारी आहेत म्हणून या क्षेत्रात जोखीम जास्त आहे. स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तिंपासून दूर राहून , त्यांचे भवितव्य पणाला लावून आपण मंडळी काम करत आहेत. याचा आपल्याला अगदी जवळून परिचय आहे.

आणि वंदे भारतमुळे भूषण मायदेशी सुखरूप आला! Click here

अशीच कुणीतरी व्यक्ती तुमच्या नकळत तुमच्या संपर्कात आली आणि तिच्यापासून तुम्हाला संसर्ग झाला असणार. अपवादात्मक परिस्थिती सोडली तर कुणी मुद्दाम कोणत्याही आजाराला आवाहन करीत नाही. स्वतःची काहीही चूक नसताना गेली काही दिवस अनेकांना कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. यापूर्वीही आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा आजार आणि दवाखान्याचा सामना केला आहे. परंतु हा आजार वेगळा आहे. मला माहिती आहे, यावेळी तुम्ही सारे कोरोनाशी एकटे झुंज देत आहात. घरी बसून सांगणे अवघड आहे परंतु कुटुंबापासून दूर प्रत्यक्ष दवाखान्यात… अगदी एकांतवासाचा तुम्ही सामना करीत आहात, अनुभव घेत आहात. जसे सीमेवरील सैनिक कुटुंबापासून दूरवर शत्रूशी लढत असतात.

Corona warriors India media doctors police are corona front fighters covid patients

खरे सांगू का, दृश्य चित्रात तुम्ही एकटे दिसत आहात पण अदृश्यपणे एक फार मोठे कवच तुमच्याभोवती आहे. ते कवच आहे, कुटुंबातील व्यक्तींचे, मित्रांचे आशीर्वाद आणि सदिच्छेचे, तुमच्या, कुटुंबातील व्यक्ती आणि पूर्वजांच्या पुण्याईचे! हे सारे कोणत्याही संकटाचा यशस्वी सामना देण्याची प्रेरणा आणि शक्ती देते.

‘नैराश्य येता मनी, करा सद्विचारांची पेरणी’ Click here

अशावेळी आपल्या देवतेचे, गुरुंचे किंवा आपल्याला प्रेरक अशा व्यक्तिचे स्मरण आपल्याला लढण्याची एक वेगळी शक्ती देते. या अप्रिय शत्रूंसोबत नकारात्मक विचारांचे एक मोठे जाळे मानवाला कवटाळत असते. अशावेळी सकारात्मक विचार हे सर्वोत्तम औषधीचे काम करते. तेव्हा मनाला नकारात्मक मार्गावर जाण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे अर्थात हे काम वाटते तितके सोपे नाही पण मनात आणले तर अवघडही नाही. तेव्हा सर्वांनी आतापर्यंत जो लक्षणीय संयम दाखवलाय तो कायम ठेवावा आणि हो फारच कंटाळा आला तर आपल्या आवडीचे फोटो, व्हिडीओ पहावेत. त्यामुळे आगळेवेगळे समाधान लाभेल.

Corona warriors India media doctors police are corona front fighters

योग आणि भोग हे टाळता येत नाहीत परंतु जेव्हा तुमच्यासारखी माणसं त्यांचा धैर्याने, संयमाने सामना करतात ना तेव्हा अशा संकटानाही काढता पाय घ्यावा लागतो आणि निघून जावे लागते. हे विषाणूही लवकरात लवकर आपली साथ सोडणार आहेत. या विषाणूचा अजून जोरदार सामना करण्यासाठी, त्यावर विजय मिळवण्यासाठी शरीरात शक्ती असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी नाष्टा, जेवण अत्यंत आवश्यक आहे. तब्येतीची सर्व लक्षणे आणि होणारा त्रास डॉक्टरांवर सोडून निर्धास्त रहावे… मग हे जग तुमचेच असणार आहे..।

– नागेश सू. शेवाळकर

करोना आणि महिलांचे विश्व Click here

 

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments