Wednesday, June 18, 2025
Homeलेखश्रमिक महिलांपुढील समस्या : घर चालवायचे कसे?

श्रमिक महिलांपुढील समस्या : घर चालवायचे कसे?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन होऊन सहा महिने झाले. या काळात सर्व सामान्य माणसाचे दैनंदिन जीवनच बदलले गेले. साधा ताप खोकला जरी आला तरी आपल्याला कोरोनाची लागणं तर झाली नाही ना ? या भीतीपोटी तो डॉक्टरकडे जाऊ लागला. तसेच घराबाहेर पडायलाही घाबरू लागला अर्थात घराबाहेर न पडणे हे आरोग्याच्या-सुरक्षेच्या दृष्टीने चांगले असले तरी घरी बसून रहाणे सर्वांनाच परवडणारे नाही.

Click here to read कोरोना जाणा:कोरोना टाळा

याच कारणाने रोजंदारीवर काम करणारे श्रमिक रोजगाराला मुकले. रोजगार नसल्याने ६०-७० टक्के लोक आपापल्या गावी घरी गेले. पण तिकडेही अशीच अवस्था ! गेल्या महिना दोन महिन्यात लॉकडाऊनचे काही नियम शिथिल झाले. उद्योग सुरु करायला शासनाने मान्यता दिली. त्यामुळे गावी गेलेले मजूर पुन्हा मुंबई, ठाणे जिल्हा ,नवी मंबई भागात परत आले .पण सर्वांनाच पुन्हा रोजगार मिळण्यात अडचणी आल्या. अनेक ठिकाणाची बांधकामे सुरु न झाल्याने, रेल्वेही बंद असल्याने सर्वांनाच पुन्हा रोजगार मिळण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणाची बांधकामे सुरु न झाल्याने बांधकामावर काम करणारा मजूर हा बेकारीशी झुंज देत आहे.

त्यात आता आणखी नवीन प्रकारच्या बिनारोजगारांची भर पडलेली दिसते. साधारणपणे तीनचार महिन्यापूर्वी घरकाम करणाऱ्या महिला मजुरांना त्या अनेक ठिकाणी कामे करीत असल्याने त्यांच्या मार्फत संसर्ग होऊन आपल्या घरातही कोरोना येईल या भीतीपोटी मध्यमवर्गीय लोकांनी आपल्याकडे धुणी,भांडी, सफाई, पोळीभाजी अशी कामे करणाऱ्या महिलांना सध्या काम करायला येऊ नका ,आम्ही तुम्हाला नंतर बोलावतो असे सांगून त्यांचे काम बंद केले. घरकाम करणाऱ्या काही महिला आपल्या कुटुंबासह गावी गेल्याने घरकाम करणार्यांनी दुसऱ्यांना काम दिल्याने मुळच्या बायका बेकार झाल्या. अनेक सोसायट्यानी बाहेरील व्यक्तींना आपल्या सोसायट्यात येण्यास बंदी केल्याने त्यांची नेहमीची कामे बंद झाली. त्यामुळे त्याही बेरोजगार झाल्या. अशा प्रकारे रोजगारावर काम करणाऱ्या श्रमिक महिलांप्रमाणेच मासिक वेतनावर घरकाम करणाऱ्या अनेक महिलांवर बेकारीची पाळी आली आहे. त्या सर्व लॉकडाऊन केव्हा उठतो याची वाट पाहत आहे.

Click here to read Mental health : जपू या, मनाचं आरोग्य

आणखी एक महत्वाचे म्हणजे रेल्वे बंद असल्याने अनेक महिला कार्यालयीन कामे घरातूनच करत आहेत. त्यांना कामाचे टेन्शन असले तरी कामावर जाण्याचे टेन्शन नसते. त्यामुळे घरची कामे बाहेरच्यांकडून करून घेण्याची सध्या तरी त्यांना गरज वाटत नाही. त्यामुळे अनेक श्रमिक महिलांना पुन्हा कामावर बोलावले गेलेच नाही .

एका श्रमिक महिलेने स्वत:चा अनुभव सांगितला. ती चांगली शिक्षित आहे. लॉकडाऊनपूर्वी पती कामावर जात असे. ही महिला आपले गृहिणीचे कर्तव्य पार पाडीत असे. पण लॉकडाऊन जाहीर झाल्याने पतीचे नेहमीचे काम बंद झाले. त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिला. पण त्या महिलेने मोठ्या धीराने आपल्या भागातच घरकाम करायला सुरवात केली. दोन चार ठिकाणी तिला कामे मिळालीही. पण अशा प्रकारच्या कामांची सवय नसल्याने अंग दुखणे, हातापायांना वळ येणे ,कंबर दुखणे अशाप्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी सुरु झाल्या. त्याही अवस्थेत आज नाईलाजाने ती
काम करीत आहे.

Photo for Representation only

काही ठिकाणी महिलांना काम मिळाले .पण मुळात घर मालकांनाच पगार मिळत नसल्याने आम्ही पगार मिळाल्यावर पैसे देऊ असे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत घर चालवायचे कसे ? असा बिकट प्रश्न आहे. ग्रामीण भागाला लागून असलेल्या शहरातील किवा विकसित होत असलेल्या भागातील महिलांनी शेतात काम मिळते का ? ते पाहण्याचा प्रयत्न केला . शेतात साचलेल्या पाण्यात लावणी, रोपणी, पेरणी, करणे अशा कामाची कधी सवय नसल्याने ती कामे सामान्य महिलांना जमत नाही. काही महिलांनी या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना निसर्गाने साथ दिली नाही. गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या पावसाने शेतीची कामेच बंद झाली.

Click here to read लोक काय म्हणतील?

ग्रामीण भागातील काही घरातून महिला मोठ्या हॉटेलना घरी बनवलेल्या तांदळाच्या भाकरी देण्याचे काम करतात. साधारणपणे १५० ते २०० भाकरी एका घरातून हॉटेलांना पुरवल्या जात असत. पण लॉकडाऊनमुळे हॉटेलही बंद झाल्याने त्यांच्या या उद्योगातही अडचणी आल्या. अशा परिस्थितीत महिला उद्योगावर सध्या मोठेच संकट आले आहे. त्यात घरकाम करणाऱ्या महिलांची आर्थिक स्थिती फारच दयनीय आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

 

विनायक बेटावडकर

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. True condition..this vivid have chahes many lives.. dont know how it will end..very sad to hear.
    Thanks for writing on such topics Sir

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?