कला ही विविध गोष्टीतून आपणास दिसून येत असते. ही कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम जाणीवपूर्वक करणं आवश्यक असते. या कलेचे विविध उपयोग आपणास होतात. त्यामुळे मानवी संस्कृती अबाधित राहते.तसेच कलाकाराने मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो.अशींच कहाणी आहे वयाच्या ६८ वर्षाचे होईपर्यंत आपल्या कलेची जोपासना करणारे नाशिक येथील सुरेंद्र सुर्यवंशी यांची. श्री सूर्यवंशी गणपतीची मुर्ती हाताने बनविण्यात माहिर आहेत.
Click here for श्री गणेश वंदना
कोणत्याही साच्याचा सहारा न घेता हाताने गणेशाची मुर्ती बनविण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल येथील जन्मलेल्या व आर्ट टिचर डिप्लोमा या कला क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या या कलाकराने आजपर्यंत विविध गणेशाच्या मुर्तींसह हिंदु धर्मातील प्रत्येक सणावाराला येणा-या देवी देवतांच्या मुर्त्यां साकारल्या आहेत. पर्यावरण पुरक अशा शाडुमातीची मुर्ती बनविण्याचा त्यांचा मानस असतो.
वेळेचा सदुउपयोग करत शाडु पासून गणपतीची मुर्ती बनविण्याची कला ते अवगत करत आहेत . आपल्या कलेचा आविष्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी यावेळी नातु शुभम सुर्यवंशी व स्वरांजली ताकाटे यांना पर्यवरण पुरक गणपती बनविण्यास मार्गदर्शन व मदत करण्याचे ठरविले व तशी ती केलीही.आज जगभरात कोरोनाचे सावट असल्यामुळे घराबाहेर न पडता व घरात बसून कंटाळवाणे होण्यापेक्षा आपल्या जुण्या छंदाला जोपासत सुरेंद्र सुर्यवंशी यांनी शाडु मातीमध्ये श्री गणेशाची सुबक अशी मुर्ती तयार केली व या चिमुकल्यांना देखील आपल्या कलेची गुरू किल्ली त्यांनी दिली. कलाकाराचा एक क्षण म्हणजे ब्रम्हदेवाची हजार युगे असे म्हणतात ,याची प्रचिती आज जेष्ठ नागरिक सुरेंद्र सुर्यवंशी यांनी दाखवून दिली आहे.
By अक्षय कोठावदे, नाशिक
Very nice..