भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS)निवड झालेल्या राज्य सेवेतील २३ अधिकाऱ्यांची निवड यादी नुकतीच जाहिर झाली आहे. अतिशय अभिमानाची बाब म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी श्री. चंद्रकांत डांगे यांचे लहान बंधू श्री प्रदीपकुमार डांगे यांची भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे. अशा प्रकारे एकाच कुटूंबातील दोन सख्खे भाऊ आयएएस अधिकारी होण्याचे हे महाराष्ट्रातील दुसरे उदाहरण आहे.
यापूर्वी चंदगड जि. कोल्हापूर येथील श्री एस. बी. पाटील जे सध्या मुंबईत महसूल प्राधिकरणाचे सदस्य आहेत व त्यांचे बंधू श्री विलास पाटील जे सध्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव आहेत हे दोन बंधू आयएएस झालेले आहेत. त्यांच्यानंतर डांगे बंधू आयएएस झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा अगदी वर्षाव होत आहे.
Click here to read शिक्षक दिन विशेष: COL आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका स्वाती वानखेडे
डांगे कुटुंब मूळचे आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील. या जिल्ह्याची मुख्य ओळख म्हणजे नक्षलग्रस्त भाग अशी आहे . अशा परिस्थितीत त्यांचे वडील ग्रामसेवक म्हणून सेवेत होते. त्यांची जशी बदली होत असे तशी या दोन बंधूंची शाळाही बदलत असे . अशा रितीने त्यांचे माध्यमिक शिक्षण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमधून झाले. वडील सरकारी नोकरीत असल्याने डांगे बंधुंवर लहानपणापासूनच प्रशासनाचा संस्कार झाला. त्यामुळे आपोआपच प्रशासनाकडे जाण्याचा दोघांत कल निर्माण झाला. दोघांनीही आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले. नुसते स्वप्नच पाहिले नाही तर त्याचा अथक मेहनतीने पाठलागही केला.
Click here to read तुकाराम मुंढे यांची पुन्हा मुदतपूर्व बदली
श्री चंद्रकांत डांगे हे आयआयटी, खरगपूर येथून इंजिनिअर झाले. तर श्री प्रदीपकुमार डांगे हे मुंबईतून व्हेटर्नरी डाॅक्टर झाले. त्यांनी महाविद्यालयात असतांनाच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात केली. त्यात त्यांना त्यावेळी यश मिळाले नाही.पण म्हणून ते निराश झाले नाही. त्यांनी आपले प्रयत्न जोमाने सुरुच ठेवले. श्री चंद्रकांत डांगे हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा १९९५ मध्ये उत्तीर्ण झाले. त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. त्याच्या पुढच्याच वर्षी श्री प्रदीपकुमार डांगे यांची देखील उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. त्यावेळी त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते.
MahaJobs Portal : नोकरीसाठी महत्वाचा दुवा Click on the link to read
आताही डांगे बंधू क्रमाने आयएएस अधिकारी म्हणून पदोन्नत झाल्याने राज्यात सर्वत्र हा चर्चेचा व कौतुकाचा विषय झाला आहे. ७५% उमेदवार थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस होतात तर २५% पदांवर राज्य सेवेतून बढती देऊन आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. श्री चंद्रकांत डांगे यांना २०१०चे केडर मिळाले होते. श्री प्रदीपकुमार डांगे यांना बहुतेक २०११ किंवा २०१२चे केडर मिळेल. श्री चंद्रकात डांगे यांची बदली मीरा – भाईंदर पालिकेच्या आयुक्त पदावरुन पुणे येथे नुकतीच संचालक, भूजल सर्वेक्षण या पदावर झाली आहे. तर श्री प्रदीपकुमार डांगे हे सध्या महाज्योती प्रोजेक्टचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. पदे येतात आणि जातात पण आपण केलेले काम कायम टिकून राहते. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये मेळ घालून कायम लोकाभिमुख सेवा देण्याचा या दोन्ही बंधूंनी प्रयत्न केला आहे.
Click on the link to read रणजी पटू, क्रिकेट प्रशिक्षक शेखर गवळी गेले चटका लावून…
या दोन्ही बंधूंनी आपले आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करुन आजच्या युवकांपुढे एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, कितीही अडथळे येवोत , निराश हताश न होता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द आपण सोडता कामा नये. आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे हाच यातून आजच्या युवापिढीला संदेश आहे. श्री प्रदीपकुमार डांगे यांनी संपादन केलेल्या या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या प्रशासकीय सेवेतील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
– सौ प्रिया रामटेककर ,मुंबई.
स्वाती वानखेडे मॅडम एक हाडाच्या शिक्षीका ह्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चे पारितोषिक प्रदान करण्यात आले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
मला वाटतं , आदिवासी पाड्यावरील शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी घेतलेले परिश्रम फळाला येणं हीच सावित्रीबाई फुलेंची स्वप्न साकार करणारी कन्याच होय !!
राजाराम जाधव,
🌹🌹🙏🙏