Wednesday, July 2, 2025
Homeबातम्याआय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Milind Mhaiskar transferred maha government
Milind Mhaiskar

मिलिंद म्हैसकर वन विभागात- म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मिलिंद म्हैसकर यांची बदली वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव श्री संजय खंदारे यांची बदली महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे.

IAS Uday Chaudhari Maha government transfer
Uday Chaudhari

औरंगाबादचे जिल्हाधिकारी श्री उदय चौधरी यांची बदली मुख्य सचिव कार्यालयात उपसचिव म्हणून करण्यात आली आहे.

नवी मुंबई येथील जलस्वराज्य प्रकल्प व्यवस्थापक ए ए गुलहाणें यांची बदली चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

IAS PMO Pune Navalkishore Ram
Navalkishore Ram

पुणे जिल्हाधिकारी श्री नवलकिशोर राम यांची प्रतिनियुक्ती पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून करण्यात आली आहे.

श्रीमती अश्विनी जोशी, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान यांना त्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले असून त्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री के एच बगाटे यांची नियुक्ती श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४