लोकांच्या अडीअडचणीत विशेषतः नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्तीत पोलीस नेहमीच आपल्या मदतीसाठी तत्पर असतात. पण अशा बिकट परिस्थितीत त्यांच्यासाठी अनेक समस्या निर्माण होत असतात. अशा कठीण परिस्थितीत सच्चे पोलीस मित्र खूप महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात….
महाराष्ट्र राज्यात पोलीस मित्र ही संकल्पना खूप वर्षापूर्वी अस्तित्वात आली .परंतु, काही पोलीस मित्र म्हणवणारे स्वतःचे काम व स्वार्थ साधणारे निघाले म्हणून पोलिस मित्र संकल्पना काही प्रमाणात बदनाम झाली . परंतु ,एका सच्चा पोलीस मित्राच्या सामाजिक कार्याने पोलीस मित्र संकल्पना किती आवश्यक आहे हेच दाखवून दिले. आपण बोलत आहोत सातारा जिल्ह्यातील पोलीस मित्र श्री.उदय आठल्ये यांच्या विषयी. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचा मान सन्मान ठेवणे हा श्री.उदय आठल्ये यांचा महत्त्वाचा गुण आहे .
आधी खाकी मग बाकी
पोलीसांवर अन्याय झाला की श्री.उदय आठल्ये तात्काळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात व त्यांना राहून साथ देतात. हे करत असताना पोलीसांच्या अडी अडचणी सोडवणे यावर त्यांचा भर असतो . सातारा येथील पोलीस वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था झाली होती. अनेक काळ या रस्त्यासाठी त्यांनी पाठपूरावा केला व आपल्या पोलीस बांधवाना चांगला रस्ता मिळवून दिला. कोरोनाच्या काळात लाँकडाऊन मध्ये अनेक वेळेला श्री.उदय आठल्ये यांनी पोलीसांना चहा , बिस्कीट ,पाणी व नाष्त्याची व्यवस्था केली. मोठ्या प्रमाणात सँनिटायझरचे वाटप केले. आपल्या पोलीस बांधवाना मास्क वाटले. इतकंच करुन ते थांबले नाहीत. तर त्यांनी सूमारे ३० पोलीस अधिकाऱ्यांना कोविड योद्धा सन्मान देऊन गौरविले. “आधी खाकी मग बाकी ” या उक्तीनूसार आज अखेर श्री.उदय आठल्ये यांचे सामाजिक कार्य चालू आहे.
बेकायदेशीर काम व ओळखीचा गैरवापर न करणे हा उदय आठल्ये यांचा स्वभाव असल्याने अनेक पोलीस अधिकारी श्री.उदय आठल्ये यांचे नेहमी कौतूक करतात. महाराष्ट्रात असे खरे ,सच्चे पोलीस मित्र मोठया संख्येने निर्माण होणे आवश्यक आहे. जेणेकरून पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावणे सोपे होईल, पर्यायाने शासन,समाज यांनाही मोलाची मदत होईल.
सच्चे पोलीस मित्र उदय आठल्ये यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ.9869484800.