Thursday, September 19, 2024
HomeUncategorizedस्पर्धा परीक्षेतील यशवंतांचा झूम सत्कार

स्पर्धा परीक्षेतील यशवंतांचा झूम सत्कार

यावर्षीच्या यूपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मिशन आयएएसच्या वतीने झूमवर आयोजित केला आहे. हा सत्कार रविवार दिनांक १६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न होणार आहे . हा कार्यक्रम मिशन आयएएसचे संचालक डॉ नरेशचंद्र काठोळे यांच्या फेसबुक लाईव्ह पेजवर पण पाहता येईल.

या सत्कारासाठी महाराष्ट्राचे साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड आय ए एस. मंत्रालयातील माजी सचिव श्री किशोर गजभिये, आयएएस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखत समितीचे सदस्य श्री रंगनाथ नाईकडे आयएफएस, माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

यावर्षीच्या निकालात मिशन आयएएस परिवारातील कु.प्रतिभा वर्मा (पूर्ण भारतातून पहिली ) श्री विशाल नरवाडे, आयएएस ९१ क्रमांक, सत्यशील यादव , आयआरएस व कु पूनम ठाकरे आयआरएस हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

मिशन आयएएसचे विशाल नरवडे झाले IAS – Click here to read this article

या वर्षीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षांमध्ये अमरावतीचे विद्यार्थी गुणानुक्रमे पहिले आलेले आहेत. त्यात कु पर्वणी रवींद्र पाटील, उपजिल्हाधिकारी , कु.रूपाली मोगरकर, तहसीलदार कु.प्राजक्ता चौधरी, लिपिक, मोहम्मद शाहिद मोहम्मद आयुब, कर सहाय्यक यांचा समावेश आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील श्री अक्षय गडलिंग व अमरावती येथील कुमारी प्राजक्ता बारसे यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. श्री अक्षय गडलिंग व कुमारी प्राजक्ता बारसे यांनी अतिशय विपरीत परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नायब तहसीलदाराची परीक्षा पास केलेली आहे. स्पर्धा परीक्षेला बसू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मिशन आयएएसचे राज्य समन्वयक श्री देवेंद्र भुजबळ,  सहसंचालक प्रा प्रवीण खांडवे, समन्वयक, श्री प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे 9890967003.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. सर्व यशस्वी विद्यार्थियांचे हार्दिक अभिनन्दन

  2. सत्कार समारंभ कार्यक्रम आम्ही फेसबुक लाईव्ह लाईव्ह बघणार आहोत. सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सरोदे परिवारा मार्फत मनःपूर्वक अभिनंदन. आपण खूप चांगला अभिनव उपक्रम राबवितआहात ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे याचाही आम्हाला आनंद वाटत आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments