Thursday, September 19, 2024
Homeसंस्कृतीनेदरलँड्समध्ये विश्व गणेशोत्सव

नेदरलँड्समध्ये विश्व गणेशोत्सव

गणेश चतुर्थी हा विनायक चतुर्थी म्हणून ओळखला जाणारा 10 दिवसांचा उत्सव आहे. भगवान गणेश हि अडथळे दूर करणारी आणि बुद्धिमत्तची देवता आहे.
सध्या जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्तरांत अनिश्चितिता जाणवते आहे. विशेषत: सणवार कसे साजरे करावेत ? असा प्रश्न सगळ्यांना पडतो आहे. यावर उपाय म्हणून ऑनलाइन दर्शन, ऑनलाइन भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिर अशा विविध उपक्रमांतून गणपती उत्सव साजरा केला जातो आहे. परंतु यामुळे बाप्पांबद्दलचे प्रेम किंवा उत्सवाबद्दलचा आपला उत्साह कमी झालेला नाही.त्यामुळे
बरेच लोक हा सण घरीच आणि डिजिटलरित्या साजरा करत आहेत.

नेदरलँडमधील रिजविस्क येथे, भारतीय डायस्पोराने शनिवारी 22 ऑगस्ट रोजी आयबीसीसी या संस्थानाने त्यांच्या स्वतःच्या मंदिरात आयोजित गणेश चतुर्थी साजरी केली. या दिवशी लोकांनी गणपतीची पूजा अनेक प्रकारे केली.
– रक्षासूत्र बांधुन.
– प्रसाद आणि फुले अर्पण करून.
– शिव अभिषेक
– होम हवन करून ई.

तसेच आपल्या संपूर्ण परिवारासह मंदिरात प्रत्येक जोडप्यास 10 मिनिटांची वैयक्तिक पूजा देखील करता आली. परंतु प्रथम ई-मेलद्वारे नोंदणी करणे बंघनकारक होते.

कोविड १९ मुळे, आयबीसीसी ने आरआयव्हीएमचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पणे पालन केले.
जसे –
* इमारतीमधून चालण्याचा मार्ग मॅप करुन ठेवला गेला होता जेणेकरून गणेशाची उपासना करण्याची प्रत्येकास संधी मिळेल.

* मार्गाच्या शेवटी, लोकांनी घरी जातांना प्रसाद आणि जेवणाची व्यवस्था केली होती.

* सरकारी नियमांमुळे लोकांना आरोग्याचे विधान पूर्ण करण्याची आवश्यकता असू शकते.

* 1.5 मीटर अंतर ठेवणे आणि तोंडाचा मास्क घालणे अनिवार्य होते.

* आरोग्याच्या समस्या असल्यास घरीच राहाणे.

कोविड -१९ च्या सर्व नियमांचे पालन करून, भाग्य आणि ज्ञानाची देवता गणेश चतुर्थी उत्साहात साजरी केली गेली .

आपण कोठेही असलो तरी श्रीगणेशासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनातील विश्वासाची भावना अखंड आहे. म्हणून प्रार्थना करू या आणि अशी आशा करूया की भगवान गणेश संपुर्ण जगाला या कोरोनाच्या संकटातून लवकरच मुक्त करतील. गणपती बाप्पा मोरया !

– सौ प्रणिता अद्वैत देशपांडे , रिजविस्क ,नेदरलँड्स.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. *🐁अनंत चतुर्दशी🐁*
    *🙏🏻आपण घरात राहू या.🙏🏻*
    *🙏🏻कोरोनावर मात करू या…🙏🏻*
    गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
    आपण कुठे ही असो आपली संस्कृती विसणार नाही.
    खूप छान लेख.🚩🚩🙏🙏🌹🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments