मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रतिथयश छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी अल्पावधीतच आपली छाप उमटवली आहे. त्यात गेली ४ महिन्यापासून कोरोनाच्या संकटाला ते अत्यन्त धीराने तोंड देत असून जनतेला सतत विश्वास देत आहेत. याने प्रेरित होऊन चित्रकार प्रकाश सोनवणे यांनी कोरोना योध्दांच्या कार्याविषयी आभार व्यक्त करणारा सचेतपट (animation film) ‘साखळी – The Chain of Corona’ तयार केला आहे. हा सचेतपट मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी म्हणजेच २७ जुलै रोजी रिलीज होत आहे. प्रकाश सोनवणे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक आहेत.
कोरोना योध्दाच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या आभारासाठी सचेतपट साकारला आहे. यासाठी त्यांनी २००८ ते २०२० या कालावधीतली निवडक चित्रे घेऊन त्यांना सचेतन करून फिल्म आर्ट स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
साधारण तीन महिन्यांच्या लॉक डॉउनच्या काळात हि ऍनिमेशन आर्ट मूवी तयार केली. सध्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत संपूर्ण जग हतबल झालेले आहे. यासाठी आपलॆ डॉक्टर ,नर्स, सफाई कर्मचारी ,पोलीस यंत्रणा यासह अनेक यंत्रणा आपल्या स्वास्थ्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. परंतु सोबत आपलीही काही जबाबदारी आहे, ज्यामुळे आपण या परिस्थितीतून बाहेर येऊ. या संपूर्ण विषयवार भाष्य करणारा हा सचेतपट आहे.
By प्रा. सुभाष पवार
खरंच खूप सुंदर
Thank you
कलावंत असलेल्या मुख्यमंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन. कलाकार असल्यामुळे ते कल्पक आहेतच आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर ते या अवघड परिस्थितीला हाताळत आहेत. आणि प्राध्यापक प्रकाश सोनावणे यांने चित्रणही उत्कृष्ट रित्या केले आहे. सोनावणे हे खरोखरच निष्नात कला अध्यापक असून गेली अनेक वर्षे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकवत आहेत. पण अध्याप ते कॉन्ट्रँक्ट बेसवर शिकवत आहेत, मँट कोर्टाने त्यांना पर्मनंट प्राध्यापकांचे सर्व लाभ देऊन नियुक्ती स्थायी करण्याचे आदेश देऊनही अजून शासनाने त्यांना पर्मनंट तर केलेच नाही पण पर्मनंट करण्याच्या मँटच्या निर्णया विरुद्ध हायकोर्टात अपिल दाखल केले आहे. त्यामुळे प्रकाश सोनवणेंंसह सोबतच्या सर्व अध्यापकांवर टांगती तलवार कायम होतीच पण आता तिचे टोक सर्वांना टोचत आहे., त्यातच गेल्या महिन्यात केबिनमध्ये पारित झालेल्या प्रस्तावात, शासनाने जे जे स्कूल ऑफ आर्ट च्या अध्यापकांना ए आय सी टी ई नुसार त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू केली आहे. पण सध्या कार्यरत अध्यापक निवृत्त होऊन नविन नियुक्त झालेल्या अध्यापकांना ते लागू होईल अशी मेख मारलेली आहे. तरी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, कृपया या प्रश्नावर जातीने लक्ष घालून हा अन्यायही तातडीने दुर करावा.