Tuesday, July 23, 2024
Homeयशकथाअर्चना पाटील ठरल्या आदर्श आई !

अर्चना पाटील ठरल्या आदर्श आई !

मूळ कल्याणकर असलेल्या पण लग्नानंतर पनवेलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्चना सुरेश पाटील आता मात्र
जगभर दिव्यांग असलेल्या रश्मी आणि जातिनची आई म्हणून ओळखल्या जात आहेत. त्यांनी या दोन्ही दिव्यांग मुलांना ज्या पद्धतीने घडविले, सक्षम केले याबद्दल त्यांना रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊन टाऊन तर्फे कल्याण येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या “आई महोत्सव” या कार्यक्रमात “आदर्श आई” म्हणून नुकतेच गौरविण्यात आले. या गौरवाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अल्प परिचय

अर्चनाताईंची दोन्ही मुलं दिव्यांग आहेत. थोरली मुलगी कर्णबधिर तर मुलगा ऑटिस्टिक आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना ज्या पद्धतीने घडवले आहे त्याकरिता त्यांचे आतापर्यंत वेगवेगळ्या स्तरावर सन्मान केले गेले आहेत. सुपर मॉम, वंडर मॉम, इन्स्पायरिंग मदर, आधुनिक हिरकणी, आशा सन्मानाने त्यांना नावाजले आहे. विविध एनजीओ, रेडिओ चॅनल, टेलिव्हिजन, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया अशा विविध माध्यमातून त्यांची व्याख्याने झाली आहेत.

अर्चनाताईना टोरी रेडिओ चॅनल, कॅलिफोर्निया; आकाशवाणी इंदोर, रेडिओ उडान, दूरदर्शन लखनऊ, झी 24 तास, प्रात्यक्षिक विद्या प्रकाश मंडळ मुंबई, लखनऊ युनिव्हर्सिटी, अमेटी युनिव्हर्सिटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती व व्याख्यानासाठी बोलवले गेले आहे. बऱ्याच वर्तमानपत्रांनी देखील त्यांच्या या यशाची दखल घेतली आहे.

अर्चनाताईंची मुलगी रश्मी ही जन्मता: कर्णबधिर आहे. पण आज गुगलवर तिची ओळख World’s best hearing impaired भरतनाट्यम डान्सर म्हणून आहे. आजवर रश्मीचे देशभर 70 हून अधिक स्टेज शोज झाले आहेत. याचबरोबर ती Rashmi’s Art, Chocolate Fantasy, अशा दोन व्यवसायांची मालकीण सुद्धा आहे. ती एक आर्ट टिचर, योगा इन्स्ट्रक्टर, कोरिओग्राफर, मॉडेल, मेकअप आर्टिस्ट, अशा वेगवेगळ्या कलांमध्ये निपुण आहे; पण हीच रश्मी लहानपणापासून मायग्रेन व लो बी पी ने ग्रस्त आहे.

मुलगा जतीन हा ऑटिस्टिक आहे. पण सध्या तो Bits Pilani Goa येथे गणितामध्ये पीएचडी करतो आहे. त्याला आजवर बऱ्याच स्कॉलरशिप मिळाल्या आहेत. त्यांतील केवीपीवाय ह्या स्कॉलरशिप मध्ये तो भारतात प्रथम आला.

जतिन वयाच्या सतराव्या वर्षापासून स्वतंत्रपणे राहतो आहे व त्याचा खर्च त्याच्या स्कॉलरशिप मधून पूर्ण करत आहे. ऑटोस्टिक असल्यामुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. सात वर्षाचा असताना त्याला celiac disease हा आजार झाला, ज्याचे पुढील रूपांतर आतड्यांच्या कॅन्सरच्या प्रायमरी स्टेजवर गेले. ह्या ट्रीटमेंट साठी त्याला सहा महिने हॉस्पिटलमध्येच ऍडमिट राहावे लागले.

अर्चनाताईंच्या आयुष्यात असे अनेक खडतर प्रसंग आले. पाटील दाम्पत्याची दोन्ही मुले दिव्यांग असल्याकारणाने नातेवाईकांनी पाठ फिरवली पण या दोघांनी हार न मानता कठीण परिस्थितीत एकमेकाना साथ दिली.

अर्चनाताईंच्या मते आपणही समाजाचे काही देणं लागतो म्हणून त्या त्यांच्यासारख्याच पालकांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन फ्री कौन्सिलिंग करतात. त्याचबरोबर त्या बॉडी आणि ऑर्गन डोनर आहेत.

अशा या अर्चनाताईंना कधी लुझर म्हणून हिणवलं जात होतं, त्यांनाच आज अर्चनाताई, अर्चना मॅम, अर्चना दीदी, म्हणून जगभर ओळखले जाते.
खरोखरच अर्चनाताईंच्या संघर्षाची कहाणी थोडक्यात मांडणं अशक्य आहे.

अर्चनाताई, त्यांचे पती आणि दोन्ही मुलांचे न्युज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः