Monday, February 17, 2025
Homeबातम्याआर्थिक श्रीमंती बरोबरच सांस्कृतिक श्रीमंती महत्वाची - देवेंद्र भुजबळ

आर्थिक श्रीमंती बरोबरच सांस्कृतिक श्रीमंती महत्वाची – देवेंद्र भुजबळ

माणसाला, समाजाला आणि देशालाही आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक श्रीमंती महत्वाची असली तरी त्या बरोबरच सांस्कृतिक श्रीमंतीलाही तेव्हढेच महत्व दिले तरच खऱ्या अर्थाने आपले जीवन श्रीमंत होईल, असे मत निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केले. ते नवी मुंबईतील मोहिनी आर्ट अकॅडमीने २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

नवी मुंबई सारख्या नव्या शहरात सांस्कृतिक, सामाजिक वातावरण निर्माण करण्याची, ते जोपासना करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन करून गेली २४ वर्षे लेखक, दिग्दर्शक, नाटककार श्री रवींद्र वाडकर अत्यंत निस्पृहपणे हे कार्य करीत असल्याबद्दल त्यांच्या विषयी गौरवोद्गार काढले.

रौप्य महोत्सवी वर्षातील विविध उपक्रमांचा प्रारंभ रवींद्र वाडकर लिखित “अर्धरात कलली” या दीर्घांकाचे अभिवाचन करून करण्यात आला. या अभिवाचनात वैशाली पाटील, दिव्या चौधरी – पगार, आरती गुरव, यश आर्या, योगेश कांबळी आणि रवींद्र वाडकर यांनी सहभाग घेतला होता. तर सुनील पगार यांनी संगीत संयोजन केले होते. अभिवाचन करण्यात आलेले दीर्घांक लवकरच रसिक प्रेक्षकांना रंगभूमीवर पहायला मिळणार असल्याची घोषणा रवींद्र वाडकर यांनी यावेळी केली. तसेच या प्रसंगी रवींद्र वाडकर लिखित “अर्धरात कलली” या गीताचा ऑडिओ तर “वाट रानातून चाले” या गीताचा अल्बम व्हिडीओ अल्बम प्रकाशित करण्यात आला. अकॅडमीच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षांत अनेक एकांकिका, दीर्घांक, अल्बम सॉंग, लघुपटाची निर्मिती अशा विविध उपक्रमातून नवोदितांना संधी देण्याचा मानस असल्याचे यावेळी श्री रवींद्र वाडकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रवींद्र वाडकर यांच्या आईच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून व श्री. नटराजचे पूजन करून अभिवाचनाला सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला अभिनेता, चित्रपट निर्माते सुनील तांबे, चित्रपट निर्मात्या लिलावती अंबावले, आयाम परफॉर्मिंग स्पेसच्या संचालिका वैशाली पाटील आदी उपस्थित होते.

अल्प परिचय

रवींद्र वाडकर यांनी त्यांच्या आईच्या स्मृतिदिनी, म्हणजेच १६ जानेवारी १९९१ रोजी मोहिनी आर्ट अकॅडमी या कला संस्थेची स्थापना केली. प्रामुख्याने नवी मुंबई परिसरातील, ठाणे, रायगड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञाच्या साथीने रंगभूमीवर विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
आजतागायत या संस्थेच्या माध्यमातून मराठी नाटक, टिव्ही मालिका व चित्रपट सृष्टीला अनेक कलाकार, तंत्रज्ञ मिळवून दिले आहेत.

बालनाट्य, एकांकिका, दीर्घांक, व्यवसायिक नाटक, अशा विविध क्षेत्रात मोहिनी आर्ट अकॅडमीचे कलाकार, लेखक, तंत्रज्ञ संचालक रवींद्र वाडकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली अविरतपणे रंगभूमीची सेवा करीत आहेत.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments