Saturday, May 17, 2025
Homeलेखचला, कास पठार पाहू या !

चला, कास पठार पाहू या !

जागतिक वारसा स्थळ दिन १८ एप्रिल रोजी असतो. या निमित्ताने खास न्युज स्टोरी टुडे च्या वाचकांसाठी
महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठाराची माहिती आणि नयनरम्य छायाचित्रे पाठविली आहेत, निसर्ग छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी. ही छायाचित्रे आपली पावले या पठाराकडे नक्कीच वळवतील…
— संपादक

जागतिक वारसा दिन हा केवळ भूतकाळातील चमत्कारांचे कौतुक करण्यासाठी नाही तर त्या इतिहासाचे भावी पिढ्यांसाठी संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, लोकांमध्ये यथा योग्य जागृतीसाठी करण्यासाठी साजरा करण्यात येत असतो. हा दिवस आपल्याला पृथ्वीवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तीची आठवण करून देतो.

या दिवसासाठी दर वर्षी एक संकल्पना निश्चित करण्यात येते. २०२५ या वर्षासाठीची संकल्पना ही “आपत्ती आणि संघर्षाच्या धोक्यांपासून या अमूल्य स्थळांचे संरक्षण करण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित करणे” ही आहे.

युनेस्को ने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत महाराष्ट्रातील ७ स्थळे आहेत. त्यापैकी
सातारा जिल्ह्यातील कास पठार हे स्थळ या यादीत २०१२ साली समाविष्ट करण्यात आले असून ते आता पर्यटन स्थळ म्हणुन विकसित झाले आहे.

कास पठार म्हणजे जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी ते प्रसिद्ध आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. २८० पुष्प प्रजातींपैकी येथे ३९ प्रजाती तसेच सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.

तर मग येत्या ऋतूत कास पठार नक्की पाहणार ना ?

विजय होकर्णे

— लेखन, छायाचित्रण : विजय होकर्णे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी

    सर, कास पठार लेख आवडला, अभिनंदन, छायाचित्रेही छान निवडलीत, पठारावरील 280 विविध प्रकारच्या वेली आणि पुष्प दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहेत. त्यांचे संवर्धन आणि प्रसार,प्रचारासाठी वन विभागाकडून या वृक्ष वेलिंचे बि जतन करून छोट्या छोट्या पाकिटात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत होता. हा प्रयोग फक्त जिल्हा स्तरावरच होता . सखाराम माने किंवा दिलिप घाडगे यांनी तपशिलवार लेख लिहून प्रत्येक वृक्ष,वेली,पुष्पाचे छायाचित्रासह ररंलनर्सरीवाले सहजपणे घेतील . बिग बियाणे जिल्हा स्तरावर किंवा आऊन लाईन‌ विक्री साठी उपलब्ध व्हावी ही विनंती .माझ्यासह सर्व प्रेमिंना आनंद होईल. होकर्णे यांनी छान लेख लिहिला , धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८