शोधिते मी मलाच पुन्हा
आणि मज भेटे ईश्वर
आत्मानंदी गमक पान्हा
होई मजला साक्षात्कार
वाटे मज जावे वनात
कळे आत्मज्ञान गमक
मूर्तिमंत हरी मनात
साऱ्या विश्वाचा जो जनक
नुरे आस ती अधिकाची
देऊन मोहाची आहुती
जोड अशी ही
अध्यात्माची
वासना ती नुरे मागुती
देही वसे तो आत्माराम
जीवन जगावे धुंदीत
जपावा घोष रामनाम
रमावे सदा स्वानंदात
— रचना : रेखा दीक्षित. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

खूपच सुंदर कृतज्ञता मनोगत मॅडम. कृतार्थ झाले वाचून.🙏🙏
मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की जयश्री पाटील आमच्या विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी आहे. सार्थ अभिमान याचा आहे की रेखा दिक्षित मॅडम या आमच्या मराठी व संस्कृत च्या शिक्षिका. उत्तरोतर मॅडमची साहित्य क्षेत्रातील प्रगती पाहून आचंबित झालो नाही तर नवलच !!