कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या बेंगळूरू विभागाच्या अध्यक्षपदी गझलाकार, व्यंग चित्रकार, न्यूज स्टोरी टुडे परिवारातील सदस्य दीपाली वझे यांची तर उपाध्यक्ष पदी डॉ अनुराग लव्हेकर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
सदरील निवड दोन वर्षासाठी राहणार आहे.
कलबुरगी येथे झालेल्या करामसाप कार्यकारणी बैठकीत बेंगळूरू विभाग कार्यकारणी घोषित करण्यात आली.
बेंगळूरू विभागाच्या माजी अध्यक्षा डॉ. संध्या राजन अणवेकर यांची राज्य कार्यकारणीवर निवड करण्यात आली आहे. प्रतिभा टेकाडे यांची कार्यवाह तर नूतन शेटे यांची सहकार्यवाह तसेच तुषार भट यांची कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. डॉ राजेंद्र पडतुरे यांचे स्वास्थ्य विचारात घेत त्यांची बेंगळूरू गौरववाध्यक्ष पदी बढती देण्यात आली आहे.
या बैठकीस करामसाप अध्यक्ष गुरय्या स्वामी, उपाध्यक्ष बी ए कांबळे, सरकार्यवाह विजयकुमार चौधरी, कार्यवाह प्रभाकर सलगरे, कोष्याध्यक्ष मिलिंद उमाळकर, प्रमोद शहा, नरसिंग मराठे, नरसिंग पाटील, हणमंत बिराजदार, अभिषेक वळसंगकर सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीस न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
हार्दिक अभिनंदन