Homeबातम्याप्रतिभा पाटील - बिर्जे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धा संपन्न

प्रतिभा पाटील – बिर्जे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धा संपन्न

आकाशवाणी हिंदी निवेदिका प्रतिभा पाटील – बिर्जे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘जन्मशताब्दी निवेदक प्रतिभा’ ही ६९ वी स्पर्धा कलाश्रमच्या वतीने नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला प्रतिभा पाटील – बिर्जे यांच्या भगिनी तथा कवयित्री सुरेखा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अभिनेते अनिल गवस म्हणाले की, कलाकाराकडे फक्त पैसा, प्रतिष्ठा असून चालत नाही तर त्याच्या कार्याचा  सन्मान ही शोधक वृत्तीने झाला तर तो त्या कलाकाराला अधिक भावतो. ‘कलाश्रम‘ या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेकडून गेल्या अनेक वर्षापासून ही प्रक्रिया होते आहे. त्याच्या पुरस्कार निमित्ताने आणि प्रमुख पाहुणे या नात्याने साक्षीदार होता आले याचा आनंद वाटतो.

त्यांच्या हस्ते अभिनेत्री, निर्माती सामाजिक कार्यकर्त्या विद्या जगे, सांस्कृतिक चळवळीचे साक्षीदार प्रकाश पवार, तालवादक सूर्यकांत सुर्वे यांचा सन्मान करण्यात आला. पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

दिवंगत कबड्डीपटू, कलावती कादंबरी मुंगळे, अभिनेते विलास उजवणे, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ म्हात्रे यांचे यानिमित्ताने स्मरण करण्यात आले.
      
साहित्यिक नारायण सुर्वे, गायिका माणिक वर्मा, साहित्यिका ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दीचा संदर्भ या स्पर्धेला होता. या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक विजयी झाले त्यांना गवस यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. मानसी तांबे, कौस्तुभ गोसावी, आश्लेषा परब, संध्या यादवाडकर हे स्पर्धक विजयी झालेले आहेत. गेल्या आठ महिन्यापासून ज्या कामगाराच्या मुलांनी कर्तुत्व सिद्ध केले आहे. त्याला अव्वल पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा या पुरस्कारासाठी तालवादक सूर्यकांत सुर्वे यांची निवड केली होती. आदर्श श्रमिक पांडुरंग परब आणि आदर्श गृहिणी रुक्मिणी परब यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन हा पुरस्कार दिला जातो. त्याला ज्येष्ठ रंगकर्मी अशोक परब यांचे मार्गदर्शन लाभलेले होते. ज्या प्रज्ञावंतांनी महाराष्ट्राचे नाव उज्वल केले अशा प्रज्ञावंताला प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. साहित्यिक चि. त्र्यं. खानोलकर जे कवी आरती प्रभू या नावाने सुद्धा लोकप्रिय आहेत.

त्यांचे एप्रिल महिन्यातील स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन त्यांनी लिहिलेल्या ‘सामना’ या चित्रपटातील ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे गाणं सादर करून गायक किशोर वेरलकर यांनी गीतांजली वाहिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा राऊत यांनी केले. सावित्री कदम, अद्वैत चव्हाण, मेघना गोखले, सविता जाधव, प्रिया राजपूरकर यांचा सुद्धा या कार्यक्रमात सहभाग होता. संस्थापक, अध्यक्ष पत्रकार नंदकुमार पाटील, संचालिका नंदिनी पाटील त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कलाश्रम’ : –
स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ‘कलाश्रम’ ही संस्था कार्य करते. या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबवला जातो. स्पर्धा, प्रत्यक्ष कलाकृती सादरीकरण असे त्याचे स्वरूप असते. प्रत्येक महिन्याला संस्थेच्या वतीने अभिनव स्पर्धा घेतली जाते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कलाश्रम संस्थेच्या कार्याची माहिती व फोटोज खूप छान आहेत. सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६