Sunday, July 20, 2025
Homeबातम्या'मराठी उद्योजक अभिमान गीत' लोकार्पित

‘मराठी उद्योजक अभिमान गीत’ लोकार्पित

मराठी उद्योजकतेच्या प्रेरणास्थानी ठरणारे, अर्थसंकेतचे संस्थापक ‘अमित बागवे’ यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘मराठी उद्योजक अभिमान गीत’ याचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झाले. यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा, सौ, रचना बागवे व श्री. मंदार नार्वेकर उपस्थित होते.

मराठी उद्योजकांसाठी बनवलेले हे गीत ऐतिहासिक ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ येथे सादर करून अमित बागवे यांनी एक आगळावेगळा विक्रम केला आहे. मी उद्योजक होणारच संस्थेतर्फे आयोजित ‘ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद’ यावेळी पार पडली. परिषदेला एक हजारहुन अधिक उद्योजकांची उपस्थिती लाभली.

हृदयस्पर्शी शब्द, जिद्दीचा सूर आणि महाराष्ट्राच्या मातीतली ऊर्जा – या सगळ्यांचं एकत्रित दर्शन म्हणजे हे “मराठी उद्योजक अभिमान गीत”. हे गाणे उद्योजकांच्या प्रत्येक संघर्षात, स्वप्नात आणि यशात प्रेरणा देणारे आहे. मराठी माणूस केवळ कलेत, साहित्यात, विचारांतच नव्हे तर उद्योग-व्यवसायातही अग्रेसर आहे, हा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. हे गाणे मराठी उद्योजकतेचे पहिलेवहिले ‘थीम सॉंग’ ठरले आहे. गाण्याच्या प्रत्येक ओळीतून मराठी माणसाचा उद्योजकीय आत्मा, ध्येयधुरंधर वृत्ती आणि महाराष्ट्राच्या मातीची ऊर्जा प्रकट होते. सदर गाणे ‘डॉ, अमित बागवे’ या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे.

वर्ष २०१६ मध्ये अमित बागवे यांनी पहिल्यांदा अर्थसंकेतच्या माध्यमातून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे मराठी उद्योजकांचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर जवळपास १० वर्षांनी अमित बागवे यांच्या उद्योजकीय गाण्याचे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे सादरीकरण होणे हा एक सुदंर योग आहे. हे गाणे जसे प्रेरणा आणि संदेश देणारे आहे, तसेच गाण्याच्या माध्यमातून अमित बागवे यांनी मराठी उद्योग जगताला बदललेल्या परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. या गीताचे बोल, संगीत व गायन ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ अर्थात संगणकाची कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केले आहे. गाण्याची संकल्पना व संकलन अमित बागवे यांचे आहे. कौश्यल्य आधारित कामे सुद्धा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ आजकाल सहजरित्या करीत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ जगात मोठी क्रांती घडवणार आहे. नोकरी असो वा व्यवसाय असो नवीन तंत्रज्ञानाची कास धरणे अतिआवश्यक असल्याचा सल्ला अमित बागवे यांनी दिला आहे.

२० जून जागतिक मराठी उद्योजकता दिवसाचे औचित्य साधून हे गाणे निर्माण करण्यात आले आहे. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी ‘२० जून’ हा दिवस सरकारतर्फे ‘जागतिक मराठी उद्योजकता दिवस’ म्हणून घोषित केला जाईल व त्यासाठी १५ दिवसांत ‘शासन निर्णय’ अर्थात ‘जी आर’ काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले. परंतु, सर्व मराठी समाजाने ‘जागतिक मराठी उद्योजकता दिवस’ मोठ्या अभिमानाने साजरा केला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. गेली दोन वर्षे ज्या पद्धतीने दावोस येथे जाऊन आम्ही रेड कार्पेट देतो, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये देखील रेड कार्पेट देतो. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही उद्योग परिषद घेतली आणि त्या जिल्हा उद्योग परिषदांमधून ९६ हजार कोटी रुपयांचे MOU झाले असे त्यांनी सांगितले.

यशस्वी उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, डॉ. सुरेश हावरे, श्री. निलेश सांबरे, डॉ. अजित मराठे, श्री. वीरेंद्र पवार, श्री. राजेंद्र सावंत, राजश्री पाटील मॅडम, श्री. संतोष पाटील, डॉ. समीर कारखानीस, डॉ. संतोष कामेरकर या मान्यवरांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?