Saturday, May 17, 2025
Homeबातम्यायूपीएससी : ठाण्याचे ४ विद्यार्थी यशस्वी

यूपीएससी : ठाण्याचे ४ विद्यार्थी यशस्वी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 2024 साली घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

या परीक्षेत ठाणे महानगरपालिकेच्या कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण घेणारे दिपाली महतो, अंकिता अनिल पाटील, वीर ऋषिकेश नागनाथ व सृष्टी सुरेश कुळये हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दिपाली महतो (RANK AIR 105), अंकिता अनिल पाटील (RANK AIR 303), वीर ऋषिकेश नागनाथ (RANK AIR 556), व सृष्टी सुरेश कुळये (RANK AIR 831) यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. हे चारही विद्यार्थी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत नियमित प्रशिक्षण घेत होते. त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या तसेच ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी नमूद केले

ठाणे महापालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही यूपीएसएसी, एमपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देणारी संस्था आहे. या संस्थेतून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून ते शासनाच्या सेवेत उच्चपदावर कार्यरत आहेत.

— लेखन : प्रसिद्धी अधिकारी. ठाणे महानगर पालिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️.9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८