“भेटी लागी जीवा”
मंडळी,
अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होऊन आता जवळजवळ एक वर्ष झालं, २२ जानेवारी २०२४ हाच तो सुवर्ण दिवस. राम मंदिर हा खरंतर कित्येक लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय परंतु गेलं वर्षभर राम मंदिरावरून नुसतं राजकारण आणि समाजकारणच जास्त चालू आहे. काही पुढार्यांनी तर अजूनही राम मंदिराला जाणीवपूर्वक भेट दिलेली नाही.
त्याचमुळे अनेक भक्त, जे देवाच्या भेटीसाठी आसुसलेले होते, यांच्या नशिबी अजूनही निखळ दर्शन आलेलं नाही. म्हणतात ना, “ती” भक्ती, आणि त्यात “पण” आला की त्याची पणती होते.
प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी साकारलेल्या “द डिव्हाईन कंपॅनियन” या कॅलिग्राफी चित्रातल्या त्या अर्धवट जळणाऱ्या पणतीकडे बघून असेच काहीसे विचार माझ्या मनात आले.

ओघळलेल्या अक्षरांमध्ये “भेटी लागी जीवा” असे लिहिलेले श्लोक आणि त्याखाली पडलेलं त्या जळणाऱ्या पणतीचं सूर्यासमान दिसणारं प्रतिबिंब बघून असं वाटतं की दिल्ली अभी बहुत दूर है.
कवितेच्या यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिक
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800