Friday, December 27, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

१. “रारंग ढांग” हे माझे अत्यंत आवडते पुस्तक आहे. मी ती पकादंबरी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी वाचली आणि त्यानंतर परत दोन वेळा वाचली. त्या कादंबरीवर चित्रपट तयार व्हावा आणि त्यात नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका करावी असे मला वाटत असे.
— विजय आपटे.

२. मस्तच आहे.
— संजय शेठ

३. ह्या पुस्तकाचा पुढचा भाग रारंग ढांग नंतर पण मस्तच आहे..
— ओंकार गावडे.

४. थॅलेसेमिया : एका नवीन रोगाची माहिती मिळाली. प्राची राजे यांना मनापासून धन्यवाद.
— विलास प्रधान, मुंबई.

५. थॅलेसेमिया म्हणजे काय ?…किती वेगवेगळ्या विषयांवरती लिखाण करता येऊ शकतं, हे यावरून समजतं. अभ्यासपूर्ण लिखाण करणार्‍या मंडळींचं खरंच कौतुक.
— प्रियांका शिंदे जगताप, कॅनडा.

६. Good information on Thalasemia 👌
— Dr Karbhari Kharat.
Asst Director (Health) Retd. Mumbai.

७. लेखिका संगीता कुलकर्णी लिखित “साहित्य तारका” या सदरातील विविध साहित्यिकांची ओळख झाली.. हे लेख वाचून “साहित्य तारकांचे” मराठी साहित्यातील योगदानाचे महत्त्व समजले.
मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य ठेवा आपल्या लेखनाच्या निमित्ताने आम्हा वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले व भुजबळ सरांचे मनापासून धन्यवाद…!
— विशाल कुलकर्णी, ठाणे

८. हसण्यासाठी जन्म आपला प्रियंका शिंदे, कॅनडा यांचा लेख खूप छान.
— अरुणा गर्जे, नांदेड

९. परिक्षण कधी च वाचलं होतं. अभिप्राय द्यायला उशीर झाला.
पु.लंचे भक्त तर आपण आहोतच… तुम्ही त्यांच्या बद्दल इतकं छान लिहीलंय ते वाचून ती भक्ती अधिकच वाढली. अगदी “शुद्ध आनंद” मिळाला.
— सौ.रेखा नांदोडे, सूरत.

१०. डॉ. दक्षा पंडितांची अक्षय तृतीया कविता फारच छान. सारांश, रुपात सर्व महत्वाचे मुद्दे आले .👏👏
— सुलभा गुप्ते, पुणे. (ह.मु.इजिप्त)

११. अरे वाह, आजच्या अंकात अक्षय तृतीया सणाचा अक्षय आनंद भरभरून वाहतो आहे. महात्मा बसवेश्वर ह्यांची माहिती मिळाली, अक्षयतृतिया कवितेमधून ह्या सणाचे महात्म्य समजले आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे “मसाला डोसा” हा लेख वाचून “हलकं फुलकं ” मनोरंजन झालं ! माझी बहीण सोनल साटेलकर हिचे मसाला डोश्यावरचे प्रेम मला ह्या लेखाच्या माध्यमातून समजले, म्हणून अधिकच आनंद झाला.
सर, तुम्हाला उभयतांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला अक्षय तृतीया सणाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
— मृदुला राजे, जमशेदपूर

१२. ‘आमचे नेपाळ पर्यटन’ छान मालिका.
— प्रियांका शिंदे जगताप, कॅनडा

१३. व्वा व्वा, राजाराम दादा, ग्रेट नेपाळ दर्शन.
— वीणा खाडीलकर.
राष्ट्रीय कीर्तनकार, मुंबई.

१४. देवेंद्रजी आपल्या परमपूज्य विजयावहिनीस आदरपूर्ण श्रद्धांजली !!
— राधिका भांडारकर. पुणे

१५. “आठवणीतील विजया वहिनी” हृदयस्पर्शी आठवणी आहेत. खूप छान लिहिले आहे.
— नागेश शेवाळकर, पुणे.

१६. “आठवणीतील विजया वहिनी” लेख सुंदर लिहिला आहे.
— किशोर विभुते, अकोला.

१७. भावपूर्ण श्रध्दांजली वहिनींना👏
सर तुम्ही खूप छान व्यक्त झाला आहात त्यांच्याबद्दल🙏
— शिवानी गोंडाळ. मेकअप आर्टिस्ट दूरदर्शन.

— टीम एन एस टी . ☎️ 9869484800p

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९