Homeसाहित्यनिरोप बाप्पाला : 2 रचना

निरोप बाप्पाला : 2 रचना

स्वस्थाना ..

    गच्छ गच्छ सूर श्रेष्ठा
    श्री गणेशा स्वस्थाना
    जड आमची पाऊले
    निरोप देता प्रस्थाना

    धावून येतो संकटात
    ना बोले जाणे वेदना
    बळ देशी दश हत्तीचे
    दुःखहर्ता गजवदना

    यथाशक्ती पूजाविधी
    न करे कठोर साधना
    अल्प सेवा कृश हस्ते
    यथोमिलितसंसाधना

    महोत्सवी दिस सरले
    जागवे भक्ती संवेदना
    कैकगोष्टी अपूर्ण तरी
    अल्पमतीला याद ना

    मंगलकार्या मंगलमूर्ती
    कधी घातली साद ना
    सोडवेना मूर्ती रुपतव
    शब्दन मिळती रूदना

    लहानथोर भक्त असा
    दरबारी तुझ्या भेद ना
    पोटभर मोदक ना देई
    कसा ना वाटे खेद ना

    लवकर ये पुढील वर्षी
    करू दे जरा आराधना
    अपुरी इच्छा होय पुरी
    परोपरी हो समाराधना

    हेमंत मुसरीफ

    — रचना : हेमंत मुसरीफ. पुणे

    निरोप

      तुझा येण्याचा मनात घोष
      आला मोदभरे सौख्य घेऊन
      बाप्पा निघाले वेळेत समयास
      सकलाना आशिष देऊन…

      पाहुणचार घेऊन निघालास
      भासे आम्हा सौख्याचे सागर
      पुरेल सर्वा इतकेच वर्षभरास
      उत्साहाने भरतो गे घागर…

      तुजसी आता निरोप देताना
      मनचित्त होते उदासी फारच
      रिकामे तव आसन घरी नेताना
      जीवास लागते घन घोरच…

      येशील पुढीलवर्षी लवकर
      घालतो गे मनाची समजूत
      निरोप आशेने देता तुज बरं
      बसतोसारेदिनरातमोजत…

      भक्तीसह विश्वास तुझ्यावर
      वर्षच व्यतीत होतसे त्यावर
      पुढील वर्षी येण्यास लवकर
      वचन देतसे आम्हा सत्वर…

      सकल संकटे व काळजी
      दूरकरी सर्वदुःख तू मोरया
      गणांचा असे तू अधिपती
      गणपती बाप्पा मोरया….

      मीना घोडविंदे

      — रचना : मीना घोडविंदे. ठाणे

      — संपादन : देवेंद्र भुजबळ.
      — निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

      RELATED ARTICLES

      LEAVE A REPLY

      Please enter your comment!
      Please enter your name here

      - Advertisment -

      Most Popular

      - Advertisment -
      - Advertisment -
      - Advertisment -

      Recent Comments