Homeबातम्याबेंगळूरू : गणेशमूर्ती कार्यशाळा

बेंगळूरू : गणेशमूर्ती कार्यशाळा

कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगी व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई तसेच आर्ट एब्स्ट्रेक्ट क्लासेसच्या सहयोगाने बेंगळूरूच्या व्हाईटफिल्ड विस्तारात पंधरा दिवसांची ‘इको फ्रेंडली गणेश मूर्तीकलेची कार्यशाळा’ घेण्यात आली. गुळगुळीत लालमातीतून शिल्प घडविण्याची कला शिकण्यास आता जेनझी सुद्धा मागे राहिले नाही.

या कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी वेगवेगळ्या वयोगटातील होते. वय वर्षे ४ ते ७ वर्षांच्या लहान मुलांनी अतिशय उत्साहाने या मूर्तीकलेला आत्मसात केले.

बेंगळूरू सारख्या अमराठी शहरात श्रीगणेश निर्मितीच्या शुभ कार्याला बहुभाषिक पालकांनीही आपला सहभाग नोंदविला. कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद साहित्याबरोबर कलेला प्रोत्साहित करते तसेच यावेळीही गणेश मूर्तीकला कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी अपूर्वा अय्यर, आव्या भंडारी, अन्वी मालशेट्टी, आदित राठोड, इंचारा किरन, धृति माथुर, कृतार्थ धारीवाल, नयजा रंजन, प्राशी गोयल, रायन निर्मल, स्मेरा शाह, श्रेयांवी शर्मा, सात्विक नायक, विहसित भारद्वाज, मिशी, वेदिका नगलिया, डॉ. नम्रता कुळकर्णी यांना कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पर्यावरणसंबंधीत जागतिक उपक्रम यशस्वी करण्यात क.रा.म.सा.प राज्याध्यक्ष गुरय्या स्वामी, क.रा.म.सा.प बेंगळूरू विभाग अध्यक्ष डॉ. व्यंकटेश देवनपल्ली आणि क.रा.म.सा.प इतर पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

दिपाली वझे

— लेखन : दिपाली वझे. माजी अध्यक्षा, क.रा.म.सा.प. बेंगळूरू विभाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments