Sunday, July 20, 2025
Homeबातम्यासफाई मित्र : आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

सफाई मित्र : आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणीत हिलदारी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शहराच्या स्वच्छतेत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सफाई मित्रांसाठी नुकतेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.

सदर शिबिरात सफाई कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी, साखर, रक्त गट, रक्तदाब, बॉडी मास इंडेक्स, दंत व मुखरोग तपासणी, डोळे तपासणी तसेच टीटी चे लसीकरण करण्यात आले. या तपासणी दरम्यान आवश्यक असणाऱ्या १४ सफाई कर्मचाऱ्यांना मोफत चष्मे देण्यात आले.
यावेळी ७ कर्मचाऱ्यांची तज्ञांमार्फत क्षयरोग तपासणी सुद्धा करण्यात आली. या तपासणी शिबिराचा एकूण ६१ सफाई कर्मचारी यांनी लाभ घेतला असून त्याच्या आरोग्याची घेण्यात येणाऱ्या काळजीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या शिबिरात डॉ मिथिला बेलोशे, डॉ भाग्यश्री भिसे, डॉ शितल चोपडे यांनी सर्व तपासण्या पार पाडून संबंधिताना उचित ते सल्ले दिले.

या आरोग्य शिबिरासाठी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री निखील जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. पालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, स्वच्छता निरीक्षक श्री सागर बडेकर, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक श्री गणेश कासुर्डे, सुरेश मडके, शहर समन्वयक श्री ओंकार ढोले, प्राथमिक आरोग्य केंद्र, पांचगणी यांचे अधिकारी व कर्मचारी, पालिकेचे स्वच्छता मुकादम तसेच प्लान फाउंडेशन व रिसीटी यांचे सहकार्य लाभले.

या शिबिरासाठी हिलदारीचे डॉ मुकेश कुळकर्णी, दीपक मदने, गणेश शेडगे, अस्मिता कासुर्डे, दिपाली धनावडे, प्राजक्ता बोडरे, शुभम भंडारी व प्रतिक राजापुरे यांनी परिश्रम घेतले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?