मन जरी पळते जोरात
कृतीचेच अवघड आहे
कार्य जरी चालते जोरात
परिणामाचे अवघड आहे
विचार जरी खूप डोक्यात
लिहून होणं अवघड आहे
चेहरे सुंदर खूप भेटतात
सुंदर मन अवघड आहे
गोड बोलणं जमेल सुद्धा
गोड वागणं अवघड आहे
पैसे खूप मिळवून सुद्धा
मनोवांच्छित अवघड आहे
नाती खूप असून सुद्धा
प्रेम मिळणं अवघड आहे
मित्र खूप मिळून सुद्धा
मैत्री मिळणं अवघड आहे
न्यायालयात जाऊन सुद्धा
न्याय मिळणं अवघड आहे
दरबारात जाऊन सुद्धा
तड लागणं अवघड आहे
दीर्घ जीवन मिळून सुद्धा
सार्थक होणं अवघड आहे
खूप खूप शिकून सुद्धा
शहाणपण अवघड आहे
देह निरोगी असून सुद्धा
दीर्घायुष्य अवघड आहे
योग्य औषध घेऊन सुद्धा
रोगमुक्ती अवघड आहे
तत्व चर्चा करून सुद्धा
जीवनार्थ अवघड आहे
धर्म धारण करून सुद्धा
नैतिकता अवघड आहे
मेंदू मृत्यू होऊन सुद्धा
अवयवदान अवघड आहे
आत्मा मुक्त होऊन सुद्धा
देहदान अवघड आहे

— रचना : सुनील देशपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
वा खूप छान रचना केली सर , मला तुमची कविता आवडली. 😊…..(अवघड जरी असले तरी शक्य आहे)😊