मीही पांघरून आले
पाऊस फुलांचा शेला
केसात माळला चाफा
मधुमास अलबेला
हळव्या शीतल धारा
भिजली हळवी माती
वाऱ्याचा गंधही ओला
प्राणाची उजळे वाती
तनू भिजवित आल्या
नितळशां जलधारा
केसात गंधीत होतो
हा मंद सुगंधी वारा
मी झाले पाऊस फुल
ही कसली पडली भूल
देहास ये लपेटून
मृद गंधाची चाहूल.

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
👌👌👌👌 छान