Homeबातम्याअमेरिकेतील लेखिकेच्या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन !

अमेरिकेतील लेखिकेच्या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन !

अमेरिका स्थित लेखिका चित्रा मेहेंदळे ह्यांनी अमेरिकेत आणि भारतात मुलखावेगळी कामगिरी करीत असलेल्या विविध स्त्रियांच्या प्रेरणादायी जीवन कथा असलेल्या “जिचं तिचं आकाश” ह्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या मंगळवारी विले पार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या सभागृहात होत आहे.

या प्रकाशन सोहोळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नगर सेविका श्रीमती अंजली सामंत, प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे संचालक इश्री अरविंद प्रभू आणि ग्रंथालीचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलासपूरकर हे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षिका आणि अभिनेत्री असलेल्या रजनी वेलणकर ह्या भूषविणार आहेत. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन सौ अलका भुजबळ करणार आहेत.

साथ संगत मंडळाचा वर्धापन दिन आणि साथ संगत मंडळा प्रकाशन , अशा या संयुक्त कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण साथ संगत मंडळ आणि हे पुस्तक वप्रकाशित केलेल्या न्यूज स्टोरी टुडे ने केले आहे. पुस्तकाची निर्मिती ग्रंथाली ची आहे.

पूर्व पिठीका :
लेखक, लेखिका, कवयित्री, वाचक, मुद्रक, प्रसार ५ अशा सर्वांच्या सहकार्याने न्यूज स्टोरी टुडे ‘पोर्टल, पब्लिकेशन्स आणि यू ट्यूब वाहिनी आगेकूच करीत आहे.

देशातील लेखक, लेखिका, कवयित्री यांची पुस्तके प्रकाशित करण्याबरोबरच परदेशातील लेखिकांची पुस्तके न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्सने यशस्वीरित्या प्रकाशित केली आहेत. केम्यान आईसलंड निवासी शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांच्या, “मी शिल्पा… चंद्रपूर ते केम्यान आईसलंड” या आत्मचरित्राचे लोकार्पण दोन वर्षांपूर्वी नागपुर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तर प्रकाशन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रविंद्र शोभणे, जेष्ठ चित्रपट लेखक, दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

तर सिंगापूर निवासी नीला बर्वे यांच्या “कोवळं ऊन” या कथा संग्रहाचे प्रकाशन गेल्यावर्षी ज्ञानवृद्ध श्री एन. एन. श्रीखंडे यांच्याहस्ते, उद्योजक म्हणून तथा व्यासंगी साहित्यिकश्री राजीव एन. श्रीखंडे, जेष्ठ पत्रकार डॉ सुकृत खांडेकर, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे,”कुटुंब रंगलय काव्यात” फेम प्रा विसुभाऊ बापट आदींच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीच्या मुहूर्तावर मुंबई येथे संपन्न झाले. या पुस्तकास पद्मश्री, सर्वश्री प्रसाद सावकार, मधु मंगेश कर्णिक, शंकरबाबा पापळकर आणि उदय देशपांडे यांच्या मिळालेल्या शुभेच्छा म्हणजे एक विक्रमच म्हणावयास हवा.

आता अमेरिका स्थित लेखिका चित्रा मेहेंदळे ह्यांचे “जिचं तिचं आकाश” प्रकाशित होत असून ही एक हॅटट्रिक होईल.

“जिचं तिचं आकाश “ह्या पुस्तकातील जीवन कथा न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर “अमेरिकेतील एक्स स्टार नवदुर्गा” आणि “जिचं तिचं आकाश” मालांमध्ये प्रसिद्ध झाल्या असून त्या सर्व प्रेरणादायी जीवन कथा ह्या पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्सने एका इंग्रजी नाटकासह 16 पुस्तके प्रकाशित केली आहेत. या वाटचालीत आपला सहभाग महत्वाचा राहिला आहे. आपल्या कल्पना, सूचना स्वागतार्ह आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. शिल्पा गंगावार यांच्या ‘ मी शिल्पा .. चंद्रपूर ते केन्यान आईसलंड या नंतर सिंगापूर स्थित नीला बर्वे यांचे’ कोवळं ऊन’ आणि आता हॅट ट्रीक म्हणून अमेरिका स्थित चित्रा मेहेंदळे यांच्या ‘जिच॔ तिच॔ आकाश ‘ न्यूज स्टोरी टुडे मार्फत प्रकाशित होत आहे त्याबद्दल देवेंद्र भुजबळ यांचे हार्दिक शुभेच्छांसह मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन !

  2. खूप छान संकल्पना. “जिच तिच आकाश” पुस्तक प्रकाशनासाठी खूप शुभेच्छा

  3. नमस्कार.
    न्यूज स्टोरीचे पाऊल पडते पुढे…
    पुस्तक प्रकाशन समारंभसाठी खूप खूप शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६