Homeसाहित्यआई : दोन कविता

आई : दोन कविता

1) आई

आई म्हणजे आई म्हणजे आई असते
डोळे उघडता समोर असते,
पाठीशी मात्र कायम असते ।।

तिच्या बाबांचे त्यागलेले सत्व,
तुमच्या बाबांचे स्विकारलेले श्रीत्व असते,
तुम्हाला सामावणारे तिचे स्वत्व असते,
तुम्हाला प्रत्यक्ष करणारे देवत्व असते,
आई म्हणजे आई म्हणजे आई असते।

हरिहारेश्वरची देवी पार्वति माझी रत्ना होते
कुणाला चारुशिला, ज्योति, प्रतिज्ञा ओ देते
कुणाची निवेदिता, वसुंधरा, सुवर्णा असते
छे हो, ती फक्त आई असते
आईला का कोणी नावे ठेवते ?

आईच्या हृदयात तुम्हाला जागा असते,
तिची कव तुमची पागा असते,
तुमचे अस्तित्व तिने कातलेला धागा असते,
तुमचे व्यक्तित्व तिने विणलेला तागा असते
आई म्हणजे आई म्हणजे आई असते।

आई ममतेचा अथांग सागर,
क्षमतेचे अथांग आकाश असते
ती समाधानाचा प्राणवायु पुरवते
ती संकल्पाची ज्योतही जागवते,
आईच विश्वासाची आधारभूमि देते।

डोळे उघडता समोर असते,
असता दिसता नाहीशी होते …..
मग काय, ती डोळे मिटल्यावरही समोर येते,
पाठीशी मात्र कायम असते
आई म्हणजे आई म्हणजे आई असते।

व्यक्ति नसते, प्रवृत्ति असते,
पाठीशी असते, कायम रहाते
आई असते…. ।।

— रचना : पुरुदत्त रत्नाकर.

2) माऊली

रणरणत्या ऊन्हांत जशी झाडाची सावली
तशी तुमची माझी आपली प्रत्येकाची माऊली !

देवालाही लागतो इथें सेंद्राचा रंग
आईसाठी असतो का हो कुटला वेगळा गंध ?

परीसा मागे धावे दुनिया सगळी
आई असते का हो परीसाहून वेगळी ?

प्रत्येकाच्या माऊलीत एक जीजाऊ असते
भाग्य शिवरांयांचे म्हणूनच तर थोर असते !

मनाला समाधान देणारी ही सांजवात
तिची रापलेली काया नी तिचा मवुशार हात

तिच्या हातच्या भाजीभाकरीला
पंचपक्कवानाचा थाट !

तिचा मऊ सुती पदर साऱ्या जगात सुंदर
नको सोन्याचा बिछाना, की नको रेशमी चादर

देवा तुझा मोठेपणा मला कबूलच नाही
तुझ्याहून सुखी आम्हीं तुला कुठे आहे आई ?

मातृत्वाच महत्व देवालाही पटले
आईसाठी बिचाराऱ्याला लहान व्हावेसे वाटले

सात आश्चर्याहूनी श्रेष्ठ आईची किमया
तिच्या एका गर्भानेच घडली सारी दुनिया !!!

विनविते हात जोडून सर्वांना
नका दु:ख देवू अशा थोर माऊलीला,

आशिर्वाद तिचें जसे फुलाप्रमाणे
आश्रूही तसे निखाऱ्याप्रमाणे

फुलासवे गंधीत व्हायचं की,
निखाऱ्यावर राख व्हायचं ?
ज्याचे त्याने आहे ठरवायचं !!!

— रचना : आशा दळवी. फलटण, सातारा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६